यल्लमवाडीत वाळूचा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:22 IST2021-05-12T04:22:39+5:302021-05-12T04:22:39+5:30

मोहोळ : यल्लमवाडी शिवारातून सीना नदीच्या पात्रातून अवैद्यरित्या वाळू घेऊन निघालेले वाहन पोलिसांनी पकडून ट्रकसह १५ लाख ...

Caught a sand truck at Yallamwadi | यल्लमवाडीत वाळूचा ट्रक पकडला

यल्लमवाडीत वाळूचा ट्रक पकडला

मोहोळ : यल्लमवाडी शिवारातून सीना नदीच्या पात्रातून अवैद्यरित्या वाळू घेऊन निघालेले वाहन पोलिसांनी पकडून ट्रकसह १५ लाख ३० हाजारांची वाळू जप्त केली.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार यल्लमवाडी शिवारातून एकुरके ते नरखेड मार्गे जाणा-या रस्त्यावर लाल रंगाचा दहा चाकी ट्रक वाळूने भरून निघाल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना मिळाली. त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल गणेश पोफळे, सत्यवान जाधव यांच्या पथकास रवाना केले आसता वाळूचा ट्रक (एम. एच. २० बी. टी. ४४४१) पकडला. प्राथमिक चाैकशीत हा ट्रक वाळू घेऊन पुण्याला निघालेला होता. तो ताब्यात घेऊन चालक राजू नारायण

देवकर (वय २६, रा. मोठा कॅनॉल जवळ, महात्मा फुले वसाहत हडपसर पुणे) याला ताब्यात घेतले असून ३० हजारांची वाळू आणि ट्रक जप्त केला. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल सत्यवान जाधव यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पोफळे करीत आहेत.

Web Title: Caught a sand truck at Yallamwadi