पिकअपसह अवैध वाळू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:23 IST2021-01-25T04:23:12+5:302021-01-25T04:23:12+5:30

पोलीस नाईक धनंजय आवताडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी चालक-मालक शहाजी पांडुरंग सावंत (सावंतवस्ती, सूतगिरणीच्या पाठीमागे सांगोला), अमोल ...

Caught illegal sand with pickup | पिकअपसह अवैध वाळू पकडली

पिकअपसह अवैध वाळू पकडली

पोलीस नाईक धनंजय आवताडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी चालक-मालक शहाजी पांडुरंग सावंत (सावंतवस्ती, सूतगिरणीच्या पाठीमागे सांगोला), अमोल संजय चांडोले (चांडोलेवाडी) व सुनील भागवत आदलिंगे (आदलिंगेमळा, कमलापूर, ता. सांगोला) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस नाईक धनंजय आवताडे, पोलीस नाईक नागेश निंबाळकर व पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख असे तिघेजण मिळून २३ रोजी रात्री ९ च्या सुमारास सांगोला शहरात गस्त घालत असताना संजयनगर झोपडपट्टीसमोर केए ४८/०१०३ पिकअप समोरून येताना दिसला. पोलिसांनी पिकअप थांबून तपासणी केली असता हौद्यात वाळू असल्याचे दिसून आले. चालकाकडे वाळू कोठून आणली, रॉयल्टी भरल्याची पावती आहे का? अशी विचारणा केली असता त्याने नसल्याचे सांगितले. पोलिसांनी सदर वाळूसह पिकअप जप्त करून पोलीस स्टेशनला आणून लावला.

Web Title: Caught illegal sand with pickup