कर्नाटकातून मंगळवेढ्याकडे येणारा गुटखा पकडला;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:12 IST2021-01-08T05:12:56+5:302021-01-08T05:12:56+5:30
मंगळवेढा : कर्नाटक राज्यातून मोटारसायकलवरून मंगळवेढ्याकडे येणारा ७ हजार रुपये किमतीचा गुटखा अन्न औषध प्रशासन विभागाने पकडला. शिवाय अर्जुन ...

कर्नाटकातून मंगळवेढ्याकडे येणारा गुटखा पकडला;
मंगळवेढा : कर्नाटक राज्यातून मोटारसायकलवरून मंगळवेढ्याकडे येणारा ७ हजार रुपये किमतीचा गुटखा अन्न औषध प्रशासन विभागाने पकडला. शिवाय अर्जुन साबळे (वय २८), सर्जेराव साबळे (रा. हंगिरगे, ता. सांगोला) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असतानाही कर्नाटक राज्यातून चोरट्या मार्गाने गुटखा मंगळवेढ्यात विक्रीसाठी येत होता. याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे मंगेश लवटे यांना मिळताच त्यांनी ७ रोजी सकाळी १०.३० च्या दरम्यान हुन्नूर येथे सापळा लावला असता वरील दोघे एम.एच. ४५ डब्ल्यू २१३५ या मोटारसायकलवरून गुटखा घेऊन जाताना मिळून आले. याची फिर्याद अन्न औषध प्रशासन विभागाचे मंगेश लवटे यांनी दिल्यानंतर वरील दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.