जुगार खेळणाऱ्या पाचजणांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:16 IST2021-06-22T04:16:12+5:302021-06-22T04:16:12+5:30

अख्तर मुसा मणेरी (रा. मणेरी वस्ती), विक्रम मारुती राऊत व जयसिंह सावता राऊत (रा. राऊत मळा), रविराज दिलीप ...

Caught five gamblers | जुगार खेळणाऱ्या पाचजणांना पकडले

जुगार खेळणाऱ्या पाचजणांना पकडले

अख्तर मुसा मणेरी (रा. मणेरी वस्ती), विक्रम मारुती राऊत व जयसिंह सावता राऊत (रा. राऊत मळा), रविराज दिलीप मस्के (रा. मस्के काॅलनी), विजय पांडुरंग माने (रा. जुना सावे रोड), विकी शंकर साळवे (रा. भीमनगर, सांगोला) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना बातमीदारामार्फत अख्तर मुसा मणेरी यांच्या घराशेजारील मोकळ्या जागेत काही लोक गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशान्वये सहायक फौजदार दत्तात्रय तोंडले, पोलीस नाईक सुनील मोरे, लीपोस कॉन्स्टेबल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल मनोहर भोसले यांनी तेथे छापा टाकून ही कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान पाच जणांना पकडले, तर एक पळून गेला. याबाबत पोलीस काॅन्स्टेबल मनोहर भोसले यांनी फिर्याद दिली.

Web Title: Caught five gamblers