साकत येथे मारहाण करून दागिन्यांसह रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST2021-02-05T06:45:04+5:302021-02-05T06:45:04+5:30

बार्शी तालुक्यातील साकत येथे एकनाथ दशरथ खटाळ (७१) यांच्या घरातून बुधवारी रात्री २ च्या सुमारास १ तोळे सोने ...

Cash lamps with jewelery by beating at Sakat | साकत येथे मारहाण करून दागिन्यांसह रोकड लंपास

साकत येथे मारहाण करून दागिन्यांसह रोकड लंपास

बार्शी तालुक्यातील साकत येथे एकनाथ दशरथ खटाळ (७१) यांच्या घरातून बुधवारी रात्री २ च्या सुमारास १ तोळे सोने व अर्धा तोळ्याचे मिनी गंठण, अर्धा तोळ्याचे डोरले, मोबाईल व १२ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.

पोलीस सूत्रांची माहिती अशी की, एकनाथ खताळ आणि त्यांच्या पत्नी घरात झोपले असता अचानक सेफ्टी डोअरचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. विरोध करताना लोखंडी रॉडने मारहाण करुन पत्नीच्या अंगावरील दागिने तसेच कपाटातील रोख रककम व मोबाईल चोरले. जागी झालेल्या खताळ कुटुंबीयांनी आरडाओरडा करताच चोरांनी कपाटातील ड्राव्हर घेऊन घराच्या पाठीमागील बाजूस शेताच्या दिशेने पळ काढला. सातशे ते आठशे फुटावरील अंतरावर जाऊन ड्राव्हरमधील सर्व सोने व रोख रक्कम पळवली. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक परजणे करीत आहेत.

----

फोटो लाईनः २८साकत-चोरी१,२

चोरी करून शेतात अस्ताव्यस्त टाकलेले घरातील साहित्य.

Web Title: Cash lamps with jewelery by beating at Sakat