चार लाखांची रोकड लंपास

By Admin | Updated: July 3, 2014 01:17 IST2014-07-03T01:17:19+5:302014-07-03T01:17:19+5:30

बार्शीत भरदिवसाची घटना: मोबाईलवर बोलणे नडले

Cash Lakhs of four lakhs | चार लाखांची रोकड लंपास

चार लाखांची रोकड लंपास


बार्शी : शहरातील अडत व्यापाऱ्याने बँकेतून काढलेली ४ लाख ३५ हजार रोख रक्कम असलेली बॅग चोरट्याने आज (बुधवारी) दुपारी दोनच्या सुमारास हातोहात लंपास केली. मोटरसायकलला बॅग अडकावून मोबाईलवर बोलत असताना संधी साधून चोरट्याने आपला कार्यभाग साधला. वर्दळ असलेल्या शिवाजीनगर भागात ही घटना घडली.
बार्शी येथील अडत व्यापारी महावीर चांदमल कुंकूलोळ यांनी शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या युनियन बँकेतून चार लाख ३५ हजार रूपये काढून ही बॅग मोटरसायकलला लावून मोबाईलवर बोलत असताना त्यांची नजर चुकवून अज्ञात चोरट्याने ही पैशाची बॅग चोरून नेल्याची घटना घडली.
महावीर कुंकूलोळ हे अडत व्यापारी असून त्यांचे मार्केट यार्डात दुकान आहे़ दुकान व्यवसायासाठी पैशाची गरज असल्याने नेहमीप्रमाणे त्यांनी आज या बँकेत येऊन चार लाख ३५ हजारांची रक्कम काढली़ ती रक्कम एका बॅगेत भरून बँकेतून खाली येऊन त्यांच्या मोटरसायकलला लावली.
तेवढ्यातच मोबाईलची रिंग वाजल्याने मोबाईलवर बोलताना गाडीची चावी खाली पडल्याने चावी घेण्यासाठी खाली वाकले, ही संधी अज्ञात चोरट्याने साधून गाडीला लावलेली पैशाची बॅग काढून पसार झाला. त्यानंतर बॅग नसल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
याबाबत शहर पोलिसांकडे महावीर चांदमल कुंकूलोळ यांनी तक्रार दिली. पोलिसांनी भादंवि ३७९ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

Web Title: Cash Lakhs of four lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.