शेतीच्या कारणावरुन कटफळथ येथे कारची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:21 IST2021-03-06T04:21:46+5:302021-03-06T04:21:46+5:30

सांगोला : शेतात आल्याच्या कारणावरुन धक्काबुक्की करीत कुऱ्हाडीने व लोखंडी सळईने कारची तोडफोड करून साडेतीन लाखांचे नुकसान केले. सांगोला ...

Car wreck at Katphalath for agricultural reasons | शेतीच्या कारणावरुन कटफळथ येथे कारची तोडफोड

शेतीच्या कारणावरुन कटफळथ येथे कारची तोडफोड

सांगोला : शेतात आल्याच्या कारणावरुन धक्काबुक्की करीत कुऱ्हाडीने व लोखंडी सळईने कारची तोडफोड करून साडेतीन लाखांचे नुकसान केले.

सांगोला तालुक्यात कटफळ येथे परीट मळ्यात चार मार्च रोजी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली असून याबाबत प्रशांत राक्षे (रा.पंढरपूर) यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार पंढरपूर येथील प्रशांत हणमंत राक्षे यांच्या काकू नंदा उर्फ शोभा राक्षे, चुलत भाऊ साहील राक्षे व महूद येथील शिवाजी ज्ञानदेव तांबवे हे सारेजण मिळून एका कारमधून (एम.एच १३, बी.एन.२७००) कटफळ (ता.सांगोला) येथील

परीट मळ्यात आले. काकू शोभा व चुलत भाऊ साहील यांना शेतात सोडून प्रशांत राक्षे कारमधून माघारी येत होते. वाटेत दिघंची येथे कल्लाप्पा दादू कुटे, अदिनाथ दादू कुटे, भगवान दादू कुटे, नामदेव कल्लाप्पा कुटे, नामदेवचा धाकटा भाऊ हे सारे जण एका कारमधून आले आणि खाली उतरले. शेतात आल्याच्या कारणावरुन कु-हाडीने आणि सळईने कारची तोडफोड केली.

Web Title: Car wreck at Katphalath for agricultural reasons