रिमझिम पावसात कारने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:28 IST2021-09-07T04:28:13+5:302021-09-07T04:28:13+5:30

ही घटना ५ सप्टेंंबर रोजी रात्री ८ वाजेदरम्यान मोहोळ शहरानजीक हॉटेल धुलवडजवळ घडली. पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार सोलापूर येथील ...

The car took a beating in the pouring rain | रिमझिम पावसात कारने घेतला पेट

रिमझिम पावसात कारने घेतला पेट

ही घटना ५ सप्टेंंबर रोजी रात्री ८ वाजेदरम्यान मोहोळ शहरानजीक हॉटेल धुलवडजवळ घडली. पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार सोलापूर येथील राहुल महादेव कराळे हे पंढरपूरहून (एम. एच. ४२ / के. ८६८०) कारने सोलापूरकडे निघाले होते. रात्री ८ वाजता रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अचानक कारमधून धूर येऊ लागल्याने त्यांनी कार रस्त्याच्या कडेला घेईपर्यंत गाडीने पेट घेतला. कराळे गाडीच्या बाहेर आले. दरम्यान जवळ आसणाऱ्या हॉटेल धुलवडचे मालक संजय क्षीरसागर यांच्या निदर्शनास ही घटना आली आणि त्यांनी तिकडे धाव घेतली. कराळे यांना धीर देत हॉटेलमधून पाणी आणून आग विझविली. यावेळी सतीश पाटील, अरविंद माने, नवनाथ काळे आणि अन्य काही लोक आग विझविण्यासाठी मदतीला धावले. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, गाडीचे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

---

फोटो :०६ माेहोळ कार

आग लागलेली कार.

Web Title: The car took a beating in the pouring rain