पानमंगरूळमध्ये गांजाची लागवड;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:04+5:302021-02-05T06:46:04+5:30

दोन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल अक्कलकोट : तालुक्यातील पानमंगरूळमध्ये शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी दोघा शेतकऱ्यांवर दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा ...

Cannabis cultivation in Panmangrul; | पानमंगरूळमध्ये गांजाची लागवड;

पानमंगरूळमध्ये गांजाची लागवड;

दोन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

अक्कलकोट : तालुक्यातील पानमंगरूळमध्ये शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी दोघा शेतकऱ्यांवर दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ६ लाख ५१ हजार ८१० रुपयांचे गांजाचे पीक पोलिसांनी जप्त केले. लकप्पा पुजारी (वय ६०) आणि रामचंद्र पुजारी (वय ४०, दोघे रा. पानमंगरूळ) असे गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

गांजाची लागवड केल्याची कुणकुण दक्षिण पोलिसांना लागली. त्यानंतर शनिवारी रात्री साडेआठ वाजता पोलिसांचे पथक पानमंगरूळमधील शेतात पोहोचले. त्यावेळी दोघांच्या शेतात सापळा लावण्यात आला. दोघांनी शेतात लावलेले ८३ किलो ७८१ ग्रॅम वजनाचे पीक पोलिसांनी जप्त केले. त्याची किंमत ६ लाख ५१ हजार ८१० रुपये इतके असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई सपोनि राठोड, पो. कॉ. राम पवार, मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस नाईक वीरभद्र उपासे, संजय पांढरे, लक्ष्मण कांबळे, सरवदे, सोनकांबळे, सुरवसे, सुतार यांनी पार पाडली.

अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरूळ येथे शेतकऱ्याने केलेली गांजाची लागवड.

Web Title: Cannabis cultivation in Panmangrul;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.