उमेदवार थांबतील अन‌् वाऱ्यासारखे उडून जातील : भरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:21 IST2021-03-22T04:21:07+5:302021-03-22T04:21:07+5:30

माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्या घरी धनगर समाजाची बैठक झाली. यावेळी दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी माजी आ. दीपक ...

Candidates will stop and fly away like a breeze | उमेदवार थांबतील अन‌् वाऱ्यासारखे उडून जातील : भरणे

उमेदवार थांबतील अन‌् वाऱ्यासारखे उडून जातील : भरणे

माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्या घरी धनगर समाजाची बैठक झाली. यावेळी दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी माजी आ. दीपक साळुंखे, संजय घुले, जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष माने, माऊली हळणवर, शालिवाहन कोळेकर, पंकज देवकते, संतोष शिरगिरे, संतोष बंडगर यांच्यासह धनगर समाजातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकी दरम्यान धनगर समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

पुढे भरणे म्हणाले, अनेकजण आक्रमक बोलून समाज पेटवण्याचे काम करतात. असे बोलून गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता टीका केली. तसेच समाजातील प्रश्न सुटावे, शासकिय कमिटीमध्ये स्थान मिळावे. त्याचबरोबर पोटनिवडणूकीची उमेदवारी मिळावी अशी भावना धनगर समाजातील काही नेत्यांनी व्यक्त केली. मात्र त्यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निवडणूक लढविणे सोपे नाही. आपण महाविकास आघाडीबरोबर राहून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.

Web Title: Candidates will stop and fly away like a breeze