खर्चाचा हिशोब सादर करण्यासाठी उमेदवारांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST2021-02-05T06:47:50+5:302021-02-05T06:47:50+5:30
सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या ६५९ जागांसाठी १२७९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या सर्व उमेदवारांना निवडणुकीनंतर महिन्याच्या आत खर्च सादर ...

खर्चाचा हिशोब सादर करण्यासाठी उमेदवारांची धावपळ
सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या ६५९ जागांसाठी १२७९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या सर्व उमेदवारांना निवडणुकीनंतर महिन्याच्या आत खर्च सादर करावा लागणार आहे. निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या विजयी उमेदवारांचे सदस्यत्व रद्द होण्याबरोबरच पुढील ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहता येत नाही. त्यामुळे सध्या सर्वच उमेदवारांची निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी धावपळ सुरू आहे.
निवडणुकीदरम्यान झालेल्या खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाच्या मर्यादेत सादर करण्यासाठी बिलांची जुळवाजुळव करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. निवडणुकीचा खर्च हा तारीख निहाय सादर करावयाचा असून जी बिले जोडली जाणार आहेत, तिही खात्रीपूर्वक जोडावी लागणार आहेत. त्यामुळे सध्या उमेदवार याच प्रक्रियेत गुंतले आहेत.
खर्च सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा
ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी उमेदवारांना तहसील कार्यालयात पायपीट करावी लागू नये ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी ऑनलाईन खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पण ग्रामीण भागात नेटवर्कच्या समस्यामुळे ऑनलाईन खर्च सादर करण्यासाठी लिंक बरोबर राहत नसल्याने अनेक उमेदवारांनी ऑफलाईन खर्च सादर करण्यास प्राधान्य दिले आहे.