ग्रामीणमध्ये ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:00+5:302020-12-30T04:29:00+5:30

काही गावांमध्ये बोटावर मोजण्याइतक्या इंटरनेट कॅफे आहेत. त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिवसभर इच्छुक उमेदवारांची गर्दी असते. मात्र सर्व्हर ...

Candidates find it difficult to apply online in rural areas | ग्रामीणमध्ये ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांची दमछाक

ग्रामीणमध्ये ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांची दमछाक

काही गावांमध्ये बोटावर मोजण्याइतक्या इंटरनेट कॅफे आहेत. त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिवसभर इच्छुक उमेदवारांची गर्दी असते. मात्र सर्व्हर डाऊन व इंटरनेट सुरू असले तरी कमी स्पीडमुळे एकाच अर्जाला मोठा वेळ लागत असल्याने कॅफे मालकासह उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. काही गावांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या गोंधळामुळे अनेक उमेदवार शेजारची गावे, पंढरपूर शहराकडे अर्ज भरण्यासाठी धाव घेत आहेत. मात्र त्या ठिकाणीही सर्व्हर डाऊनचा व्यत्यय येत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ एक दिवसाचा कालावधी आहे. त्यामुळे उमेदवार मिळेल त्या ठिकाणी मागेल तेवढे पैसे देऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.

अर्ज शुल्कात मनमानी वसुली

इंटरनेट कॅफेमध्ये अनेक प्रकारचे अर्ज ऑनलाइनद्वारे भरले जातात. त्यासाठी ठरावीक रक्कम स्वीकारली जाते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमुळे इंटरनेट कॅफे चालकांनाही सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. एरव्ही ठरावीक रक्कम घेऊन अनेक महत्त्वाचे ऑनलाइन फॉर्म भरणारे कॅफे चालक ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरताना मात्र मनमानी फी वसुली करताना दिसत आहेत. हे शुल्क ५०० रुपयांपासून एक हजार ते पंधराशे रुपयांपर्यंत स्वीकारले जात असल्याने उमेदवारांची अडचण निर्माण झाली आहे.

फोटो लाईन :::::::::::::::::::::::::

पंढरपूर येथील शासकीय धान्य गोदामात ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अशी मोठी गर्दी झाली आहे.

Web Title: Candidates find it difficult to apply online in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.