शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरातील अतिक्रमणविरोधात मोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 16:50 IST

सोलापूर : शहरातील प्रमुख रस्त्याकडेला असलेल्या अतिक्रमणाविरुद्ध आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मोहीम सुरू केली आहे. आज पहिल्याच दिवशी सात रस्ता ते मोदी रेल्वे पूल मार्गावरील २५ टपºयांवर जेसीबी फिरविण्यात आला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमणधारकांनी आपले बस्तान बसविले आहे. यात अनेक व्यापाºयांनी फुटपाथ काबीज केले आहे. त्यामुळे पादचाºयांना सुरक्षित ...

ठळक मुद्देफुटपाथवरील अतिक्रमणाबाबत वारंवार सूचनाआता ही मोहीम तीव्रपणे राबविण्यात येणार भाजी विक्रेते रस्त्यावर आढळतील त्यांच्यावर फौजदारी करण्यात येईल : मनपा आयुक्त

सोलापूर : शहरातील प्रमुख रस्त्याकडेला असलेल्या अतिक्रमणाविरुद्ध आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मोहीम सुरू केली आहे. आज पहिल्याच दिवशी सात रस्ता ते मोदी रेल्वे पूल मार्गावरील २५ टपºयांवर जेसीबी फिरविण्यात आला. 

शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमणधारकांनी आपले बस्तान बसविले आहे. यात अनेक व्यापाºयांनी फुटपाथ काबीज केले आहे. त्यामुळे पादचाºयांना सुरक्षित ये-जा करण्यासाठी फुटपाथचा उपयोग होत नाही. फुटपाथच्या पुढे जाऊन प्रमुख चौकात अनेक ठिकाणी फळविक्रेते, खाद्यपेय विक्रेत्यांनी बस्तान बसविले आहे. यामुळे रस्त्याच्या मध्यापर्यंत या अतिक्रमणाचा त्रास होतो. यामुळे सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी अनेकवेळा रस्ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण विभागाला आदेश दिले; पण प्रभावी कारवाई होत नव्हती. 

२ मेपासून आयुक्त डॉ. ढाकणे यांनी अतिक्रमण विरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्याची सुरुवात सात रस्ता चौकापासून करण्यात आली. शासकीय विश्रामधाम ते जातपडताळणी कार्यालयाच्या मार्गावर असलेल्या रस्त्यावरचे अतिक्रमण काढण्याची मोहीम बुधवारी सकाळी पार पडली. यावेळी आयुक्त डॉ. ढाकणे स्वत: हजर होते. अतिक्रमणविरोधी पथकाचा जेसीबी व डंपर चौकात दाखल झाले. कर्मचाºयांनी या ठिकाणी रस्त्यावर असलेल्या भेळ, चायनीज, आईस्क्रीम, वडापाव विक्रीच्या सुमारे २५ गाड्या जेसीबीने उचलून डंपरमध्ये घातल्या. या सर्व गाड्या जप्त करून भांडार विभागात जमा करण्यात आल्या आहेत. यापूर्वी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावरील पार्किंग मोकळे करण्याची मोहीम घेण्यात आली होती. आता रस्त्यावर थाटलेली दुकानदारी संपविण्यात येणार आहे. 

बड्या दुकानांवर जेसीबीच्शहरात महत्त्वाच्या ठिकाणी अनेकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. अशी दुकाने आता अतिक्रमण पथकाच्या रडारवर आहेत. नगरसेवक, पुढारी अशांची नावे सांगून अतिक्रमण पथकावर दादागिरी करणाºयांचीही आता दुकानदारी बंद होणार आहे. जुना पुणे नाका येथे तर चक्क रस्ते विकास महामंडळाच्या रस्त्यावर शेड मारण्याचा प्रयत्न झाला आहे.

भाजी विक्रेत्यांवर फौजदारी...च्रस्ते व पदपाथ व्यापाºयांसाठी नव्हे तर नागरिकांच्या वहिवाटीसाठी आहेत. विजापूर महामार्गावर तर भाजी विक्रेत्यांनी फुटपाथ काबीज केल्याचे दिसून येत आहे. १५ मेच्या आत भाजी विक्रेत्यांनी चैतन्य भाजी मंडईत जागा धरली पाहिजे; अन्यथा त्यानंतर जे भाजी विक्रेते रस्त्यावर आढळतील त्यांच्यावर फौजदारी करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. 

शहरातील महत्त्वाचे चौक व वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. फुटपाथवरील अतिक्रमणाबाबत वारंवार सूचना देऊनही हटविले जात नाही. त्यामुळे आता ही मोहीम तीव्रपणे राबविण्यात येणार आहे. - डॉ. अविनाश ढाकणे, मनपा आयुक्त

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाPoliceपोलिसSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस