शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण कोरोना मृतांवर शहरातच दहन; स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 13:29 IST

किमान बारा तासांची प्रतीक्षा : शववाहिका, लाकूड, गोवºया मिळण्यातही अडचण

ठळक मुद्देकोरोना मृतांची वाढती संख्या व नैसर्गिक तसेच अपघाती मृत्यू  यामुळे शववाहिका चालकांवर कधी नव्हे तो कामाचा ताण आला सोलापूर महापालिकेच्या चार वाहनांमधून सध्या सरासरी चार ते पाच मृतदेह विविध स्मशानभूमीत पाठविले जातातजून, जुलै महिन्यात कोरोनाचा मृत्यूदर अधिक असल्यामुळे एका-एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला दोन ते दिवस लागायचे

राकेश कदम

सोलापूर : ग्रामीण भागातील बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांवर शहरातील स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी वेटिंग असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी स्मशानभूमीत आणखी एका विद्युत दाहिनीचे तर अक्कलकोट रोड येथील स्मशानभूमीत गॅस दाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे.

शहरात मे, जून आणि जुलै महिन्यात कोरोनाचा कहर झाला होता. दररोज सरासरी सहा ते सात लोकांचा मृत्यू व्हायचा. नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. अंत्यसंस्कारासाठी दोन- दोन दिवस लागत होते. आॅगस्ट महिन्यात शहरातील कोरोना नियंत्रणात आला; मात्र ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागातील व्यक्तींना शहरातील शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मरण पावलेल्या व्यक्तींना महापालिकेच्या ताब्यात देण्यात येते.

महापालिकेचे कर्मचारी नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ग्रामीण भागातील लोक शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मोदी स्मशानभूमी, रुपाभवानी स्मशानभूमीत मृतदेह दहनाला वेळ लागत आहे. लाकडे, गोवºया वेळेवर मिळत नाही. पावसाच्या दिवसांमुळे मृतदेहाचे दहन होण्यासही विलंब लागत असल्याचे मोदी स्मशानभूमीतील राजू डोलारे यांनी सांगितले.

आजही लागतात १२ तासकोरोना मृतांची वाढती संख्या व नैसर्गिक तसेच अपघाती मृत्यू  यामुळे शववाहिका चालकांवर कधी नव्हे तो कामाचा ताण आला आहे. सोलापूर महापालिकेच्या चार वाहनांमधून सध्या सरासरी चार ते पाच मृतदेह विविध स्मशानभूमीत पाठविले जातात. जून, जुलै महिन्यात कोरोनाचा मृत्यूदर अधिक असल्यामुळे एका-एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला दोन ते दिवस लागायचे. आता एखाद्या मृत व्यक्तीचा अहवाल प्रलंबित असेल तर मृतदेह बाजूला ठेवला जातो. परंतु सकाळी मरण पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायला आजही किमान १२ तासांचा कालावधी लागत असल्याचे लादेन शेख यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या