वेळापूरजवळ धावती गाडी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:19 IST2021-04-03T04:19:21+5:302021-04-03T04:19:21+5:30

: अकलूज-सांगोला रोडवरील वेळापूरजवळ एका धाब्यासमोर शुक्रवारी दुपारी ३ वाजता धावता चारचाकी गाडीस अचानक आग लागली. या आगीमध्ये चारचाकी ...

Burn the running vehicle near Velapur | वेळापूरजवळ धावती गाडी जळून खाक

वेळापूरजवळ धावती गाडी जळून खाक

:

अकलूज-सांगोला रोडवरील वेळापूरजवळ एका धाब्यासमोर शुक्रवारी दुपारी ३ वाजता धावता चारचाकी गाडीस अचानक आग लागली. या आगीमध्ये चारचाकी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली; मात्र जीवितहानी टळली.

वाढेगाव (ता. सांगोला) येथील मुलाणी कुटुंबीय जवळच्या नातेवाइकांचा अकलूज येथे साखरपुडा असल्यामुळे स्वतःच्या चारचाकी गाडीमधून (एमएच ०२/बीटी ०००२) अकलूजकडे जात होते. यावेळी वेळापूरजवळील सूर्यविजय धाब्यासमोर पाठीमागून मोटर सायकलवरून येणाऱ्या व्यक्तीने तुमच्या गाडीच्या पाठीमागील बाजूस धूर निघत असल्याचे सांगितले. यामुळे चालक नौशाद इब्राहिम मुजावर (रा. पिराची कुरोली) याने चारचाकी गाडी बाजूला घेतली. प्रसंगावधान राखून त्याने गाडीतील सरदार गुलाब मुलाणी (वय ६१), सुगराबी सरदार मुलाणी (वय ४८), फिरोज सरदार मुलाणी (वय ४८), शबनम फिरोज मुलाणी (वय ३०) व दोन लहान मुलांना गाडीतून उतरवले. काही क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच वेळातच वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हे.कॉन्स्टेबल अनिल बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ थिटे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके यांनी पाण्याचा टँकर बोलवून गाडी वाझविली. सदर घटनेची वेळापूर पोलीस स्टेशनला नोंद झाली आहे. पुढील तपास पोहेकाॅ. अनिल बनसोडे करीत आहेत.

Web Title: Burn the running vehicle near Velapur