तडवळ येथे ५२ हजारांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:21 IST2021-08-01T04:21:52+5:302021-08-01T04:21:52+5:30
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी संजयकुमार रावतप्पा कोळी (रा. तडवळ) याचे कुटुंब ३० जुलै रोजी रात्री १० वाजता ...

तडवळ येथे ५२ हजारांची घरफोडी
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी संजयकुमार रावतप्पा कोळी (रा. तडवळ) याचे कुटुंब ३० जुलै रोजी रात्री १० वाजता जिन्याचे दरवाजे लावून झोपले होते. पहाटे साडेपाच वाजता उठून दरवाजा उघडण्याचे प्रयत्न केले असता, उघडले नाही. तेव्हा शेजारील नातेवाइकांना बोलावून चोरट्यांनी बाहेरून लावलेली कडी काढली. तेव्हा खाली येऊन पाहिले असता, कडीकोयंडा उचकटून कुलूप काढून कपाटामधील ३५ हजार रुपये किमतीचे दोन तोळे सोन्याचे ४ ग्रॅम लॉकेट चार नग, कर्णफुले २ ग्रॅम वजनाचे अंगठी, ४ हजार ५०० रुपये किमतीचे १५ तोळे चांदीचे दागिने, मुलीचे पैंजण, चांदीची वाटी. रोख रक्कम १३ हजार असा तब्बल ५२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला. अधिक तपास हे.कॉ. मल्लिनाथ कलशेट्टी करीत आहेत.
---