शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा भिर्र! लम्पीचा प्रादूर्भाव कमी झाल्याने सोलापुरात बैलगाडा शर्यतींना परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 17:59 IST

लम्पीचा प्रादूर्भाव कमी झाल्याने सोलापुरात बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आली आहे. 

संताजी शिंदे  

सोलापूर : लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील बैलगाडी शर्यत भरविण्यासाठी आयोजकांना परवानगी देण्यात आली आहे. परवानगी बाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्षेत्रात कोणताही प्राणी बाजार भरविणे, प्राण्यांच्या शर्यती लावण्यास परवानगी देण्याबाबतचे अधिकार राज्य शासनाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. 

प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांना त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीस यापूर्वीच अधिकार प्रदान केले आहेत. असे असले तरी शासन अधिसूचना मधील अटी व शर्थीच्या अधीन राहून, सोलापूर जिल्ह्यातील बैलगाडी शर्यत आयोजनास परवानगी देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या १६ डिसेंबर २०२१ रोजीच्या निर्णयानुसार घटनापिठाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून १० डिसेंबर २०१७ रोजी नियम प्रसिद्ध केले होते. महाराष्ट्र क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत नियम २०१७ मध्ये विहित करण्यात आलेल्या नियम व अटी लागू करण्यात आले होते. महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून वेळोवेळी अधिसूचना निर्गमित केल्या आहेत. यामध्ये शासन अधिसूचना, निर्णय, परिपत्रकामधील अटी व शर्थींचे पालन आयोजकांनी काटेकोरपणे करणे बंधनकारक आहे.

जनावरांना १०० टक्के लसीकरण आवश्यक शर्यतीतील सर्व बैलांच्या जोड्यांचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण केल्याचे शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील. शासन परिपत्रकातील अटी व शर्थीनुसार नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. ज्या गावांमध्ये बैलगाडी शर्यत घेण्यात येणार आहे; तेथील सर्व गोवंशीय जनावरांचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण १०० टक्के पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय पशुवैद्यकीय संस्थेचा दाखला आवश्यक राहणार आहे. 

बैलगाडी शर्यत भरविण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिता विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५६ प्रमाणे आणि प्राण्यांमधील संक्रामक व संसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मधील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - मिलिंद शंभरकर,जिल्हाधिकारी, सोलापूर

 

टॅग्स :Solapurसोलापूर