मोहोळमध्ये फौजदारासह दोघांची बुलेट चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:30 IST2021-06-16T04:30:54+5:302021-06-16T04:30:54+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ जून रोजी कुरुल रस्त्यावरील चंद्रलोक पार्क येथे राहणाऱ्या बाळासाहेब कुबेर इंगोले यांनी नेहमीप्रमाणे ...

The bullet of the two was stolen along with the faujdar in Mohol | मोहोळमध्ये फौजदारासह दोघांची बुलेट चोरीला

मोहोळमध्ये फौजदारासह दोघांची बुलेट चोरीला

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ जून रोजी कुरुल रस्त्यावरील चंद्रलोक पार्क येथे राहणाऱ्या बाळासाहेब कुबेर इंगोले यांनी नेहमीप्रमाणे घरासमोर एमएच १३ डीएन ४५७७ ही बुलेट पार्क केली होती. रविवारच्या पहाटे ५ वा वाजेच्या दरम्यान ते व्यायाम करण्यासाठी जात असताना बुलेट दिसली नाही व गेटही उघडे दिसल्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला तरी मिळून न आल्याने चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्याचबरोबर घरासमोर राहणारे मोहोळ पोलीस ठाण्याचे फौजदार सुधीर खारगे यांचीही एमएच २५ एएफ ३६२५ ही दुसरी बुलेट चोरीला गेल्याचे लक्षात आले.

याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल शरद ढावरे हे करत आहेत.

---

Web Title: The bullet of the two was stolen along with the faujdar in Mohol