नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला साडेसहा लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:11+5:302020-12-30T04:29:11+5:30
ऑक्टोबर महिन्यात शहाजी शिंदे यांना मुंबईवरून राज पाटील नावाच्या व्यक्तीचा मोबाइलवर फोन आला. त्याने ‘नवरी मिळे नवऱ्याला आंतर विवाह ...

नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला साडेसहा लाखांचा गंडा
ऑक्टोबर महिन्यात शहाजी शिंदे यांना मुंबईवरून राज पाटील नावाच्या व्यक्तीचा मोबाइलवर फोन आला. त्याने ‘नवरी मिळे नवऱ्याला आंतर विवाह सोहळा’ ही शासनमान्य संस्था नागपूर व मुंबई येथे असल्याचे सांगितले. तुम्हाला पंढरपूर, सोलापूर व मोहोळ येथे कार्यालय टाकून देणार आहे. त्यापोटी शासनाकडून १५ ते २० हजार रुपये पगार देतो, म्हणत नोकरीचे आमिष दाखविले. यामुळे शहाजी शिंदे यांनी १६ युवकांना जोडून दिले.
त्यानंतर राज पाटील याने या युवकांना संस्थेच्या सदस्यत्वासाठी ३ हजार ५६० रुपये फी भरुन घेतले. विवाहोत्सूक युवक-युवतींशी मोबाईलवर संभाषण करुन दिले. यात जोडप्यांचे संबंध जुळल्यानंतर लग्नासाठीचे साहित्य व शासनाकडून दोन लाखांचे अनुदान मिळविण्यासाठी ५० हजार रुपये लागतात. राज बनसोड व राज पाटील यांच्या इंडिया बँक खाते नंबर ९५९६४९३२० व ९३७३१५१०६५ तसेच राज बनसोड यांच्या ‘फोन पे’वर ६ लाख ६६ हजार रुपये पाठविले. यानंतर या युवकांना लग्नाच्या कोर्टामार्फत महादेव कांबळे या तरुणाची साखरपुड्याची १ डिसेंबर तारीख व १२ डिसेंबर लग्नाची तारीख दिली गेली. यानंतर संबंधीत व्यक्तींशी मोबाईलद्वारे वारंवार संपर्क करुनही बंद असल्याने फसवलो असल्याचे शहाजी शिंदे याच्या लक्षात आले.
पोलिसांकडे घेतली धावस
ज्या १६ जणांची ओळख करुन दिली त्यांनीही िदलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावला. दरम्यान शहाजी शिंदे यांनी राज पाटील व राज बनसोड या व्यक्तींच्या नावावर जिल्हा पोलीस अधीक्षक सायबर क्राइम सोलापूर, मुंबई पोलीस स्टेशन, कोल्हापूर पोलीस स्टेशन व पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. अद्याप त्याची दखल घेतली नाही, शिंदे यांचे म्हणणे आहे.