Breaking; रायगडावरून आलेली शिवरायांची पालखी विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:38 PM2020-07-02T12:38:20+5:302020-07-02T12:46:46+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका रायगडावरून घेऊन पंढरपूरला पाच शिवभक्त आले.

Breaking; Shivaraya's palanquin from Raigad waiting for Vitthal's darshan! | Breaking; रायगडावरून आलेली शिवरायांची पालखी विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रतीक्षेत !

Breaking; रायगडावरून आलेली शिवरायांची पालखी विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रतीक्षेत !

googlenewsNext
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका घेऊन रायगड ते पंढरपूरला येण्याची परंपरा मागील सात वर्षांपासून सुरू गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका रायगडावरून घेऊन पंढरपूरला पाच शिवभक्त आले आहेतशासनाने परवानगी दिलेल्या नऊ पालख्यांनाच श्री विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाची भेट घेण्यासाठी परवानगी मिळाली

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळयानिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका घेऊन रायगड ते पंढरपूरला येण्याची परंपरा मागील सात वर्षांपासून सुरू आहे. शासनाने यंदा मानाच्या संतांच्या पालख्यांना मंजुरी दिली, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीला परवानगी दिली नाही. यामुळे गनिमीकाव्याने प्रवास करुन आपण गुरुवारी पंढरपूरला आलो असल्याचे संदीप महिंद् यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका पंढरपूरला घेऊन आलेले संदीप महिंद पुढे म्हणाले की, मागील अडीच महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा करण्यासाठी परवानगी मागत होतो, परंतु शासनाकडून परवानगी मिळाली नाही. यामुळे आहे त्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका घेऊन पाचजण पायी चालत निघालो. या पायी प्रवासादरम्यान आम्हाला कुठेही कोणतेही पोलिसांनी अडविले नाही. आमचा रायगड ते पंढरपूर प्रवास निर्विघ्न झाला, असेही संदीप महिंद यांनी सांगितले. 

पादुका रायगड चढणार नाही... होणाऱ्या संघर्षाला शासन जबाबदार 

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका रायगड  वरून घेऊन पंढरपूरला पाच शिवभक्त आले. शासनाने परवानगी दिलेल्या नऊ पालख्यांना श्री विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाची भेट घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे.  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती प्रशासनाला शासनाकडून  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांना विठ्ठल भेट घडवून देण्याबाबत कोणतीही सूचना मिळाल्या नाहीत. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पादुका घेऊन विना परवाना पंढरपूर प्रवेश केलेल्या मंडळींना विठ्ठल मंदिरा बाहेर ताटकळत उभे रहावे लागले आहे. विठ्ठल दर्शन मिळाले नाही, तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका रायगड च्या पायथ्याशी ठेवणार आहे. परंतु पादुका रायगड चढणार नाही. मात्र यानंतर होणाऱ्या संघर्षाला शासन जबाबदार असल्याचे संदीप महिंद यांनी सांगितले आहे

गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका रायगडावरून घेऊन पंढरपूरला पाच शिवभक्त आले आहेत. मात्र शासनाने परवानगी दिलेल्या नऊ पालख्यांनाच श्री विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाची भेट घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती प्रशासनाला शासनाकडून  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांना विठ्ठल भेट घडवून देण्याबाबत कोणतीही सूचना मिळाल्या नाहीत, असे सांगितले गेले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका घेऊन आलेल्या मंडळींना विठ्ठल मंदिराबाहेरच उभे रहावे लागले आहे.

Web Title: Breaking; Shivaraya's palanquin from Raigad waiting for Vitthal's darshan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.