सोलापूर - सायरन्स स्पोर्ट्स व वेलनेस टीम अहमदाबाद (गुजरात) यांच्या तर्फे 15 ऑगस्ट 2020 रोजी इंडियन रनिंग डे व्हर्च्युअल रन स्पर्धा आयोजित केले होते. या स्पर्धेत साईश्वर गुंटूक याने हातात झेंडा घेऊन तब्बल 42 किमी धावून आपल्या नावे नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (इंग्लंड) ने घेतली होती. त्याचे प्रमाणपत्र २९ डिसेंबर रोजी साईश्वरला मिळाले आहे.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (इंग्लंड) मध्ये सलग दुसऱ्यादा नाव नोंदवून साईश्वर गुंटूकने महाराष्ट्रात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. बऱ्याच राष्ट्रीय पातळीवरील धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेत आजपर्यंत 186 हुन अधिक पदके व सन्मान चिन्ह तसेच अनेक प्रमाणपत्र संपादित केले आहे. यापुढे ही अशीच भरीव कामगिरी सातत्याने चालू ठेवण्यासाठी आपले पाठबळ मिळावे. हा सन्मान एकट्या साईश्वरचा नसून सम्पूर्ण सोलापूर जिल्ह्याचा मान म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (इंग्लंड) कडून मिळाले आहे. ही स्पर्धा GPS आपद्वारे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.
या रनिंग स्पर्धेत भारतामधील विविध राज्यातून 25,415 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यात आपल्या सोलापूरच्या साईश्वर केशव गुंटूक हा सर्वात लहान खेळाडू होता. साईश्वर आपल्या अथक परिश्रम व जिद्दीच्या जोरावर हा प्रवास गेल्या तीन वर्षांपासून अखंड चालू ठेवत आपली अनोखी छाप उमटवून पुन्हा एकदा सोलापूरचा नाव उंचावून गौरव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करत आहे. कमी वयातला जास्तीत जास्त धावण्याच्या स्पर्धेत विक्रम नोंदविणारा खेळाडू म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.