पशुधन पर्यवेक्षकाचे घर फोडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:28 IST2021-09-16T04:28:55+5:302021-09-16T04:28:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क : बार्शी : शहरात माउली चौकातील बंद घर फोडून चोरट्यांनी कपाटातील सोने, ...

Breaking down the livestock supervisor's house | पशुधन पर्यवेक्षकाचे घर फोडून

पशुधन पर्यवेक्षकाचे घर फोडून

लोकमत न्यूज नेटवर्क :

बार्शी : शहरात माउली चौकातील बंद घर फोडून चोरट्यांनी कपाटातील सोने, चांदीचे दागिने व रोख रकमेसह ६० हजारांचा ऐवज चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली.

ही घरफोडी दोन दिवसांपूर्वी झाली; मात्र बुधवारी उघडकीस आली. याबाबत पशुधन पर्यवेक्षक मनोज नवनाथ काशीद (रा. अलीपूर रोड, माउली चौक, बार्शी) यांनी फिर्याद दिली.

चोरट्यांनी ४२ हजारांचे सोन्याचे दागिने, पाच हजारांची चांदीची चेन व रोख १३ हजार रुपये असा ६० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

फिर्यादी मनोज काशीद हे भातंबरे येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक म्हणून काम करतात. दि. १२ रोजी महालक्ष्मीनिमित्त निमंत्रण आल्याने घरास कुलूप लावून मेहुण्याची कार घेऊन पिंपरी साकत येथे आई-वडिलांकडे गेले होते. ते बुधवारी सकाळी परत आल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले दिसले.

Web Title: Breaking down the livestock supervisor's house