Breaking; प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 09:02 IST2020-09-01T08:57:19+5:302020-09-01T09:02:47+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पंढरपूर : कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असताना जमाव जमवून मास्क न घालता सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, विश्व वारकरी सेनेचे अरुण महाराज बुरघाटे यांच्यासह अन्य लोकांवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करावे. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेना, बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने पंढरपुरात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रकाश आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे, गणेश महाराज शेटे, धनंजय वंजारी, आशोक सोनोने, रेखा ठाकूर, आनंद चंदनशिवे, सागर गायकवाड, रवी सर्वगोड, माऊली हळनवार यांच्यासह अन्य ११ ते १२ लोकांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन न केल्याप्रकरणी त्यांच्यावर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गायकवाड करत आहेत.