शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Breaking; बार्शी-भूम महामार्ग शेतकऱ्यांनी अडविला; जाणून घ्या नेमकं कारण 

By appasaheb.patil | Updated: September 22, 2022 13:17 IST

अतिवृष्टी व पीकविम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळावी म्हणून शेतकरी आक्रमक

सोलापूर :  अतिवृष्टी व पीकविम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळावी म्हणून गुरूवारी सकाळी पुन्हा अतिवृष्टीतून वगळलेले बार्शी तालुक्यातील शेतकरी, शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बार्शी- भूम मार्गावरील आगळगाव येथे रस्त्यावर उतरले.

सरकारविरोधी घोषणा देत सुमारे एक तास हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन बार्शीचे नायब तहसीलदार संजीवन मुंढे व आगळगाव मंडळ अधिकारी सारिका राऊत यांनी स्वीकारले. या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे हवालदार राजेंद्र मंगरूळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवला होता. यावेळी मुन्ना डमरे, सुनील माने, मुकेश डमरे, चुंबच्या सरपंच सुषमा जाधवर, कळंबवाडीच्या सरपंच प्रभावती मुंढे, भानसळेच्या सरपंच शकुंतला हिरे, मांडेगावचे सरपंच पंडित मिरगणे, भोयरेचे सरपंच दशरथ टेकाळे, काटेगावचे सरपंच चंद्रसेन गवळी, आगळगावच्या सरपंच पुतळाबाई गरड आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना गायकवाड म्हणाले की, वारंवार शांततेच्या मार्गाने निवेदने देऊन व आंदोलने करून सुद्धा शासन झोपलेलच आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये! अन्यथा ठरल्याप्रमाणे शेतकरी मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही असा खणखणीत इशाराही यावेळी गायकवाड यांनी दिला. पोपट डमरे, शरद उकिरडे, दिगंबर विधाते आदींची यावेळी भाषणे झाली.

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfloodपूर