शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Breaking; बारामतीकराच्या आदेशाने मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या नव्या निवडीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 15:50 IST

 जिल्हाध्यक्षानी पत्र देऊन नाराज गटाची केली नाराजी दूर : जुनेच  पदाधिकारी जैसे थे 

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

पक्ष संघटनेत बदल करताना जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी निवडी जाहीर केल्याने नाराज झालेल्या  २० पदाधिकारी यांनी पक्षनेते अजित जगताप व तालुकाध्यक्ष भारत बेदरे यांच्या नेतृत्वाखाली गोविंदबाग गाठत हायकमांड शरद पवार यांच्याकडे  जिल्हा नेतृत्वाबद्दल तक्रारीचा पाढा वाचला होता. तसेच नव्या निवडीला आव्हान दिले होते. दुसऱ्याच दिवशी खा. शरद पवार यांचा सोलापूर दौरा झाला त्यादरम्यान याबाबत गुप्त चर्चा झाली, अखेरीस जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी या नव्या निवडीला स्थगिती दिल्याचे पत्रच दिले. 

मंगळवेढा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भारत बेदरे व शहराध्यक्ष  मुझ्झमिल काझी  यांना विश्वासात न घेता नव्या निवडी जाहीर केल्याचे त्यांना सोशल मीडियावरून समजले. जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, राहुल शहा,  लतीफ तांबोळी, रामेश्वर मासाळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत नव्या पदाधिकारी  निवडीची पत्रे रात्री पदाधिकारीयांना  देण्यात आली होती. यामध्ये तालुकाध्यक्ष पदी प्रा पी बी पाटील, तर शहराध्यक्ष पदी चंद्रशेखर कोंडुभैरी यांची नव्याने निवड केली होती.  या नव्या निवडीनंतर जुने पदाधिकारी नाराज झाले होते त्यांनी  थेट बारामती गाठून नेते शरद पवार याच्या कडे उमेश पाटील, लतीफ तांबोळी यांच्याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यांनी  हे पक्षाचे मालक झाल्याप्रमाणे मनमानीपणे ह्या नव्या  निवडी केल्या असून जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांचीही यामध्ये दिशाभूल केल्याचे स्पष्टपणे सांगितले होते, यावर उमेश पाटील यांनी या निवडीला भगीरथ भालके, राहुल शहा , लतीफ तांबोळी , रामेश्वर मासाळ यांच्या शिफारशी वरून ह्या नवीन निवडी करण्यात आल्या असून माझा या निवडीशी काडीमात्र संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे ह्या निवडीमागील खरे राजकारण समोर आले होते. त्यामुळे संतापलेल्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी नवे पदाधिकारी हटाव मोहीम सुरू केली होती.

या नव्या निवडीवरून सुरू झालेले अंतर्गत शीतयुद्ध हे आगामी निवडणुकीत पक्षाला घातक ठरू नये म्हणून यासाठी नव्या निवडीना स्थगिती देऊन जुने पदाधिकारी जैसे थे ठेवले असल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दिले आहे.  यावेळी पक्षनेते अजित जगताप,  तालुकाध्यक्ष भारत बेदरे,  नगरसेवक प्रवीण खवतोडे , शहराध्यक्ष मुझ्झमित काझी आदी उपस्थित होते .नव्या निवडीना स्थगिती मिळाल्याचे वृत्त समजताच शहरात उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.....................................शरद पवार यांनी आमच्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेत  विश्वासात न घेता केलेल्या नव्या निवडीला स्थगिती देऊन विश्वास दाखविला आहे. यापुढे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, दिपक साळुंके,  जिल्हाध्यक्ष बळीराम साठे ,भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकटीकरनासाठी झटत राहू असे पक्षनेते अजित जगताप व तालुकाध्यक्ष भारत बेदरे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले

टॅग्स :SolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण