शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

Breaking; मोहोळजवळ रुग्णवाहिकेचा अपघात; तिघांचा मृत्यू, दहा जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 11:12 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूरसोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळजवळ एका रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात रुग्णवाहिकेमधील तीन जण जागीच ठार आहेत. तर दहाजण जखमी झाले आहेत. पुण्यावरुन हैदराबादकडे जात असताना रुग्णवाहिकेने एका माल वाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. एका मृतदेहाला घेऊन ही रुग्णवाहिका निघाली होती.

पुण्यात रोजगारासाठी स्थायिक झालेल्या राठोड कुटुंबीयांतील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतदेह हैदराबाद येथे मूळगावी नेताना शववाहिकेला अपघात होऊन त्यात एका महिलेसह तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दहा जण जखमी झाले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूरनजीक मोहोळ येथे शनिवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मृतांमध्ये ३५ वर्षाच्या शववाहिका चालकाचाही समावेश असून त्याचे नाव समजू शकले नाही. रवी माणिक राठोड (वय ३८) व बुध्दीबाई चन्नापागूल (वय ४५) अशी अन्य दोघा मृतांची नावे आहेत. सोलापूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर मोहोळ येथे शववाहिका समोरील एका माल वाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार आदळली आणि हा अपघात घडला.

मूळचे हैदराबादजवळ राहणारे राठोड कुटुंबीय रोजगार तथा उदरनिर्वाहासाठी पुण्यात वारजे माळेवाडी येथे राहतात. त्यांच्या घरातील एका पुरूषाचा अचानकपणे मृत्यू झाल्याने त्याचा अंत्यविधी मूळगावी उरकण्यासाठी मृतदेह शववाहिकेतून हैदराबादकडे नेण्यात येत होते. शववाहिकेत, मृतदेहाजवळ शोकाकूल राठोड कुटुंबीयांसह निकटचे काहीजण बसले होते. मध्यरात्री शववाहिका मृतदेह घेऊन पुण्याहून निघाली होती. पहाटे मोहोळजवळ आल्यानंतर समोरील एका वाहनाला शववाहिका अचानकपणे आदळली. शववाहिकाचालकाला पहाटे डुलकी लागल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

मोहोळ पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. सर्व दहा जखमींना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवाळी पर्वातच हा अपघात झाल्याने मोहोळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातPuneपुणेhyderabad caseहैदराबाद प्रकरण