शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ब्रिटिशांचा शस्त्रसाठा लुटणाऱ्या बहाद्दूर हौसाक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST

हौसाक्का पाटील चार वर्षाच्या असताना त्यांच्या मातेचं निधन झालं. क्रांतिसिंहांनी दुसरा विवाह न करता आपली मुलगी हाच खरा आपल्या ...

हौसाक्का पाटील चार वर्षाच्या असताना त्यांच्या मातेचं निधन झालं. क्रांतिसिंहांनी दुसरा विवाह न करता आपली मुलगी हाच खरा आपल्या वंशाचा दिवा आहे, असे म्हणून त्यांना सांभाळलं. चिमुकल्या वयामध्ये हौसाक्का हातात तिरंगा घेऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध रस्त्यावरती आल्या. त्यांच्या जडणघडणीसाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांना वेळ मिळाला नाही.

हौसाक्का यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं आणि ब्रिटिशांचं जुलमी राज्य नष्ट व्हावं, यासाठी निर्भीडपणे लढा उभारला. सुरलीच्या घाटात ब्रिटिशांच्या गाडीवर छापा टाकला. वांगी इथला ब्रिटिशांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. भवानीनगर रेल्वे स्थानकावर इंग्रजांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी वेषांतर करून योजना आखली आणि ती त्यांनी यशस्वी करुन दाखविली. गोवा स्वतंत्र व्हावा यासाठी त्या मांडवी नदी पार करून पणजीत पोहोचल्या. छत्रपती संभाजीराजे यांच्यानंतर मांडवी नदी पार करण्याचे सामर्थ्य हौसाक्का पाटील यांच्यामध्येच होते.

पुरुषांप्रमाणे स्त्रियादेखील हिंमतवान, निर्भीड, लढवय्या आणि महाबुद्धिमान असतात हे हौसाक्कांनी दाखवून दिलं. त्यांच्या सारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतरही त्या शांत बसल्या नाहीत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये त्यांनी उडी घेतली. कष्टकरी, कामकरी, शेतकरी यांना न्याय मिळावा, यासाठी सतत शासन व्यवस्थेविरुद्ध लढत राहिल्या. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्या सतत संघर्ष करत राहिल्या.

तत्कालीन फडणवीस सरकारने पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिल्यानंतर हौसाक्का चवताळून उठल्या. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये त्यांनी जाहीर सभेत या पुरस्काराला विरोध केला. सांगलीत शिवसन्मान जागर परिषदेमध्ये काहीजणांनी जितेंद्र आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केला, त्यावेळेस त्याच कार्यक्रमात हातात काठी घेऊन त्या उभ्या राहिल्या.

हौसाक्का पाटील यांची हिंमत, निर्भीडपणा, स्वाभिमान, बाणेदारपणा, तळमळ, संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील. त्या केवळ क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या आणि भाई भगवानराव मोरे पाटील यांच्या पत्नी एवढीच त्यांची मर्यादित ओळख नाही तर, त्या देखील स्वतः शूर, निर्भीड आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या.

हौसाक्कांना अनेक वेळा तुरुंगवास झाला. इंग्रजांनी त्यांच्या घरावरती अनेकवेळा छापा टाकला. बालपणापासून त्यांना संघर्षाला सामोरे जावे लागले. स्वातंत्र्यानंतरही अनेक आंदोलनांमध्ये त्यांना तुरुंगवास झाला. पण, त्या डगमगल्या नाहीत. संकटसमयी त्या लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या.

त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभले. त्यांच्या मुलांनी, सुनांनी, नातवंडांनी त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपलं. त्यामुळे त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभलं. हौसाक्का पाटील या स्वातंत्र्यासाठी लढल्या. आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरती त्या अनंतात विलीन झाल्या. इतिहास पाहिलेल्या, इतिहास घडवलेल्या आणि वर्तमानाला प्रेरणा देणाऱ्या त्या ऐतिहासिक महामानव आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता आपल्या सर्वांना व्यथित करणारी आहे.

आम्ही हौसाक्का पाटील यांना अनेकवेळा भेटायला जायचो. त्यामुळे त्यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेणे, त्यांना पाहिल्यानंतर प्रेरणा मिळत असे. त्या इतिहासातील महामानव आहेत तर, वर्तमानातील दीपस्तंभ आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

- डॉ. श्रीमंत कोकाटे (लेखक इतिहास संशोधक आहेत.)

-----