एक ब्रास अवैध वाळू जप्त; आठजणांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:02+5:302021-02-05T06:46:02+5:30
पोना धनंजय आवताडे, पोना निंबाळकर, पोना गवळी, पोना क्षीरसागर हे गस्तीवर असताना वाढेगांव ते सावे रोडवरील संतोष खटकाळे यांच्या ...

एक ब्रास अवैध वाळू जप्त; आठजणांविरूद्ध गुन्हा
पोना धनंजय आवताडे, पोना निंबाळकर, पोना गवळी, पोना क्षीरसागर हे गस्तीवर असताना वाढेगांव ते सावे रोडवरील संतोष खटकाळे यांच्या शेताजवळ माण नदीपात्रात काही लोक पिकअप व अशोक लेंलंड या वाहनातून चोरुन वाळू भरुन वाहतुक करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता एमएच ५० /५१३८ व एम.एच. ०८/डब्ल्यू ३७८९ या दोन वाहनांत ८ जण विनापरवाना वाळू भरताना दिसून आले. पोलिसांनी चालक सुनील ज्ञानू दिघे व पोपट सीताराम मदने या दोघांना ताब्यात घेऊन पळून गेलेल्या इसमांची नावे विचारली असता त्यांनी दादासो दत्तात्रय दिघे, बालाजी बापू चौधरी, रमेश तुकाराम दिघे, पिकअप मालक गोरख राजाराम लेंडवे, पप्पू उमराव हजारे, अजित संजय हजारे (रा. वाढेगांव, ता. सांगोला) असल्याचे सांगितले.