मुलानेच दुचाकी अन् सोन्याची अंगठी चोरून नेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:24 IST2021-08-23T04:24:51+5:302021-08-23T04:24:51+5:30

याबाबत रमेश बाबुराव सुरवसे यांनी मुलगा सदाशिव रमेश सुरवसे (रा. बोरिवली-मुंबई यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. जवळा येथील रमेश ...

The boy stole the bike and the gold ring | मुलानेच दुचाकी अन् सोन्याची अंगठी चोरून नेली

मुलानेच दुचाकी अन् सोन्याची अंगठी चोरून नेली

याबाबत रमेश बाबुराव सुरवसे यांनी मुलगा सदाशिव रमेश सुरवसे (रा. बोरिवली-मुंबई यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

जवळा येथील रमेश सुरवसे यांचा मुलगा सदाशिव सुरवसे याने १५ मे ते १७ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास जवळा येथील राहत्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. रमेश सुरवसे यांची एमएच ०२/ एबी ३८७९ ही दुचाकी व अर्धा तोळे सोन्याची अंगठी त्यांच्या संमतीविना लबाडीने चोरली. या घटनेची माहिती समजताच वडील रमेश सुरवसे यांनी मुलगा सदाशिव यास माझी दुचाकी व अंगठी मला परत दे, असे म्हणाले असता मी देणार नाही, हे घर माझे आहे. तुम्ही तुमचे सामान घेऊन मुंबईला निघून जा, परत आला तर सोडणार नाही, अशी दमदाटी केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: The boy stole the bike and the gold ring