अक्कलकोट येथे ग्रंथदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:23 IST2021-04-28T04:23:29+5:302021-04-28T04:23:29+5:30

अक्कलकोट : श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयात ग्रंथ पूजन स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन ...

Book Day celebrated at Akkalkot | अक्कलकोट येथे ग्रंथदिन साजरा

अक्कलकोट येथे ग्रंथदिन साजरा

अक्कलकोट : श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयात ग्रंथ पूजन स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करून ग्रंथ दिन साजरा करण्यात आला.

यावेळी इंगळे यांनी ग्रंथालयांबद्दल गौरवोदगार काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा शैलशिल्पा जाधव होत्या. स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टने २५ बेडचे अद्ययावत कोविड सेंटर सुरू केले. अहोरात्र तीथे वैद्यकीय सेवा सुरू आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे. असे उपाध्यक्षा आरती काळे यांनी सांगितले. सर्जेराव जाधव ट्रस्टचे अध्यक्ष व श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयाचे संचालक कै. उद्धवराव जंगाले यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी इंदुमती जंगाले यांनी वाचनालयातील ग्रंथ ठेवण्यासाठी दोन लोखंडी रॅक वाचनालयास भेट दिले. संयोजन सुरेश भोसले यांनी केले. कार्यक्रमास आरती काळे, प्रा.भीमराव साठे, ॲड. प्रशांत शहा, सुरेश भोसले, बाळू जंगाले, ग्रंथपाल दत्तात्रय बाबर, दिनकर शिंपी, प्रसाद काळे, यश जाधव, स्नेहा नरके उपस्थित होते.

--

२६ अक्कलकोट

शहाजी वाचनालयात ग्रंथदिन साजरा करताना महेश इंगळे, शैलशिल्पा जाधव, आरती काळे, अड. प्रशांत शहा,

Web Title: Book Day celebrated at Akkalkot