वडिलोपार्जित जागेवरील बोगस नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:26 IST2021-08-12T04:26:00+5:302021-08-12T04:26:00+5:30
कुर्डूवाडी : टाकळी (टे) येथे ग्रामपंचायत मिळकतवर लागलेली बेकायदेशीर नोंद रद्द करून त्या जागेवर चालू असलेले बांधकाम थांबवावे या ...

वडिलोपार्जित जागेवरील बोगस नोंद
कुर्डूवाडी : टाकळी (टे) येथे ग्रामपंचायत मिळकतवर लागलेली बेकायदेशीर नोंद रद्द करून त्या जागेवर चालू असलेले बांधकाम थांबवावे या मागणीसाठी मुलगा रविकांत गोफणे यांनी कुर्डूवाडी पंचायत समितीच्या आवारत झाडाखाली धरणे आंदोलन सुरू केले आहे. टेंभुर्णी विभागाचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी भारत रेपाळ यांनी याबाबत लवकरच कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच आंदोलनकर्त्यांने आंदोलन मागे घेतले.
आंदोलनकर्ते रविकांत गोफणे हे टाकळी (टे) येथील रहिवासी असून, त्यांच्या वडिलोपार्जित भारत गोफणे यांच्या जागेवर ग्रामसेवकाने उताऱ्यावर नाव आढळून येत नसल्याचे उत्तर माहिती अधिकारात काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यामुळे ही मिळकत एकाच व्यक्तीच्या नावावर असताना दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ग्रामसेवकाने नोंद लावल्याचे आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे. नाव लावताना वरिष्ठांची कोणतेही परवानगी घेतली नाही. त्याच्या चतु:सीमा ही चुकीच्या असल्याचे आढळून आले. त्यामुळे ती नोंद रद्द करावी यासाठी धरणे आंदोलन केले. यावर गटविकास अधिकारी संताजी पाटील हे रजेवर असल्याने विस्तार अधिकारी भारत रेपाळ यांनी लेखी पत्र देत लवकरच नोंद रद्द करत असून, संबंधितावर योग्य ती कारवाही करत असल्याचे आश्वासन आंदोलनकर्त्याला दिले. यानंतर आंदोलनकर्त्याने धरणे आंदोलन मागे घेतले.
................
फोटो : १० कुर्डूवाडी
वडिलोपार्जित जागेवर ग्रामसेवकाने दुसऱ्या व्यक्तीची बेकायदेशीर नोंद घेतल्याच्या धरणे आंदोलन करताना रविकांत गोफणे.
100821\20210810_123949.jpg
धरणे आंदोलन बातमी फोटो