पंढरीत बोगस डॉक्टरला अटक

By Admin | Updated: July 8, 2014 00:47 IST2014-07-08T00:47:58+5:302014-07-08T00:47:58+5:30

आषाढी वारीतील घटना; बोगस डॉक्टरविरोधी पथकाची कारवाई

Bogas doctor in the stalker arrested | पंढरीत बोगस डॉक्टरला अटक

पंढरीत बोगस डॉक्टरला अटक


पंढरपूर : आषाढी यात्रेत गर्दी पाहून कोणताही शासकीय परवाना नसताना पैसे कमविण्याच्या उद्देशाने रुग्णांना तपासण्याचे दुकान मांडलेल्या बोगस डॉक्टरला विरोधी पथकाने पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार सोनवणे यांनी सांगितले.
डॉ. मंदार सोनवणे यांना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास माहिती मिळाली असता मार्केट यार्ड पंढरपूर येथे एक इसम स्वत: डॉक्टर आहे, असे भासवून लोकांना तपासून अ‍ॅलोपॅथीचे इंजेक्शन व गोळ्या देत होते. यावेळी डॉ. सोनवणे यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी डॉ. पंकज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने औषध विभागाचे सहायक आयुक्त वीरेंद्र रवी, औषध निरीक्षक व्ही. व्ही. नागरे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य इमारतीसमोर गेले, तेव्हा त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या (क्र. एम. एच. ३१/झेड ५७६१) गाडीमध्ये श्रीराम गोविंद पोपटघाट (रा. कहाकर बु।।, ता. सेनगाव, जि. हिंगोली) हा लोकांची तपासणी करत होता. त्याच्याकडे यावेळी अ‍ॅलोपॅथीची औषधे, इंजेक्शन व स्टेथोस्कोप होता.
वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची सनद बाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी पथकाने श्रीराम पोपटघाट त्याच्या कागदपत्राची मागणी केली असता त्याच्याकडे कोणतीही मूळ कागदपत्रे सादर केली नाहीत.
स.पो.नि. जी. आर. बल्लाळ यांनी त्यास ताब्यात घेतले. त्यांची त्याची चौकशी केली असता तो दहावी पास असल्याचे निदर्शनास आले.
----------------------------------
पंढरपुरातील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सर्वांनी महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अन्वये वैद्यकीय व्यवसाय ठिकाणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची सनद दर्शनी भागावर लावावी.
- वीरेंद्र रवी
सहायक आयुक्त, औषध प्रशासन
-----------------------------
पंढरीत आलेल्या भाविकांनी उपचारासाठी डॉक्टरांकडे जाताना डॉक्टर बोगस आहे का नाही याची खात्री करूनच जावे अन्यथा रुग्णांना इंजेक्शन व औषधाचे रिअ‍ॅक्शन येऊन त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
- मंदार सोनवणे, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय

Web Title: Bogas doctor in the stalker arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.