शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तुताऱ्या वाजवा नाही तर मशाली पेटवा, पण...! चंद्रकांत पाटलांनी भाजपचं गणितच सांगितलं; पवारांनाही काढला चिमटा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 15:08 IST

यावेळी रायगडावर लोकसभेपूर्वी तुतारी वाजतेय... वाजेल का...?' असा प्रश्न एका पत्रकाराने केला असता पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आणि मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या ताब्यात गेल्यानंतर, निवडणूक आयोगाने नुकतेच शरद पवार गटाला नवे नाव आणि चिन्ह बहाल केले आहे. शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' असे नाव आणि 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह मिळाले आहे. शरद पवार गटाने या चिन्हाचे अनावरण रायगड किल्ल्यावर केले. यासंदर्भात बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी तुताऱ्या वाजवा, नाही तर मशाली पेटवा, पण शेवटी महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, पण आता क्रॉस करू असे दिसत असल्याचे म्हटले आहे. ते सोलापूर येथे पत्रकारांसोबत बोलत होते.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील? - यावेळी रायगडावर लोकसभेपूर्वी तुतारी वाजतेय... वाजेल का...?' असा प्रश्न एका पत्रकाराने केला असता पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "तुताऱ्या वाजवा नाही तर मशाली पेटवा, पण शेवटी महाराष्ट्रात आतापर्यंत आम्ही 45 म्हणत होतो, पण आता क्रॉस करू असं दिसायला लागलं आहे. मोदीजींची लोकप्रीयता जी वाढायला लागली आहे, एकाने फार छान विश्लेषण केले आहे की, मोदी जी हे जात पात भाषा धर्म याच्या वर गेले आणि एक लाभार्थी नावाचा गट त्यांनी निर्माण केला. तो म्हणतो, बाबानो तुमचं राजकारण राहुद्या बाजूला, आम्हाला मोदी हवे आहेत. याचे प्रत्यंतर अगदी  दोन महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसलं, तीन राज्यांच्या निवडणुकीत दिसलं." 

"शरद परावांनी असं म्हणायचंच असतं..."-"मध्यप्रदेशात एवढं मोठं एकतर्फी यश कधी मिळालंच नव्हतं भारतीय जनता पार्टीला. त्यामुळे लोकांनी ठरवलेलं आहे... शेवटी विरोधी पक्षाने शेवटपर्यंत हार मानायचीच नसते ना. सारखं म्हणायचंच असतं, शरद परावांनी असं म्हणायचंच असतं की, माझे 20-22 येणार आहेत. नशीब ते 20-22 तरी देतायत इकडे. पण त्यांना हे कळून चुकले आहे की 45 वैगेरे काही नाही, बहुतेक 48 पर्यंत गाडी जाईल," असा चिमटाही पाटील यांनी शरद पवारांना काढला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणBJPभाजपा