ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुरूल येथे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:22 IST2021-01-25T04:22:54+5:302021-01-25T04:22:54+5:30

कुरूल : मोहोळ तालुक्यात कुरूल (ता. मोहोळ) येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवबसव प्रतिष्ठान व शिवसेना शाखा ...

Blood donation at Kurul on the occasion of Thackeray's birthday | ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुरूल येथे रक्तदान

ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुरूल येथे रक्तदान

कुरूल : मोहोळ तालुक्यात कुरूल (ता. मोहोळ) येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवबसव प्रतिष्ठान व शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका उपप्रमुख विनोद आंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ४१ जणांनी रक्तदान केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तालुकाप्रमुख अशोक भोसले, अण्णासाहेब पाटील व लिंगदेव निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुरुषांबरोबर महिलांनी सहभाग नोंदवला. या शिबिरामध्ये एकूण ४१ दात्यांनी रक्तदान केले.

शिबिरास झेडपी सदस्य शैला गोडसे यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, तालुका उपप्रमुख विनोद आंबरे, अण्णासाहेब पाटील, लिंगदेव निकम, भीमाचे संचालक चंद्रसेन जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष छत्रपती जाधव, प्रमोद जाधव, प्रा. ज्ञानेश्वर जाधव, गुरुदेव पाटील, बाबूराव पाटील, भारत जाधव, सुहास घोडके, विशाल लिगाडे, अभिषेक आंबरे, शुभम आंबरे उपस्थित होते. रक्तदान यशस्वी करण्यासाठी मेडिकेअर ब्लड बँकेचे प्रकाश सातपुतेंनी परिश्रम घेतले.

---

फोटो : २३ कुरूल १

शिवबसव प्रतिष्ठान व शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना विनोद आंबरे.

Web Title: Blood donation at Kurul on the occasion of Thackeray's birthday