वडाळ्यात रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:56+5:302021-06-22T04:15:56+5:30

वडाळा : उत्तर सोलापूर तालुक्यात वडाळा येथील ओंकार ग्रामीण रूग्णालयात रुग्णांसाठी झटणारे डॉ. अनिल कुलकर्णी, डॉ. मानसी कुलकर्णी, सुनील ...

Blood donation camp in Wadala | वडाळ्यात रक्तदान शिबिर

वडाळ्यात रक्तदान शिबिर

वडाळा : उत्तर सोलापूर तालुक्यात वडाळा येथील ओंकार ग्रामीण रूग्णालयात रुग्णांसाठी झटणारे डॉ. अनिल कुलकर्णी, डॉ. मानसी कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, डॉ. रुपाली कुलकर्णी हे कुटुंब धडपडते आहे. डॉ. अनिल कुलकर्णी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामस्थांनी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले.

गुरुदेव दत्त यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. यावेळी दिलीप सोंडगे , कैलास सातपुते, गजानन नाईक, प्रशांत राजपूत, यशवंत गायकवाड, मनोज मोहिते ,अतुल गायकवाड, सदानंद फंड,अजय वाघमारे इत्यादी उपस्थित होते. सिद्धेश्वर ब्लड बँकेने या उपक्रमाला सहकार्य केले.

---

फोटो : २१ वडाळा

ओंकार ग्रामीण रूग्णालयात रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना डॉ. अनिल कुलकर्णी, डॉ. मानसी कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, डॉ. रुपाली कुलकर्णी,दिलीप सोंडगे, कैलास सातपुते, गजानन नाईक

Web Title: Blood donation camp in Wadala