स्व.कल्याणशेट्टी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:58+5:302021-07-23T04:14:58+5:30
अक्कलकोट : येथील शिक्षण महर्षी स्व. पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता ...

स्व.कल्याणशेट्टी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज रक्तदान शिबिर
अक्कलकोट : येथील शिक्षण महर्षी स्व. पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड यांनी दिली. २३ जुलै रोजी अक्कलकोट शहरातील हसापूर रोड येथील लोकापुरे मल्टिपर्पज हॉल येथे सकाळी कै.कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमा पूजनाने शिबिराला सुरुवात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
याप्रसंगी अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी नगरपालिका क्षेत्रासह, ग्रामीण भागातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
तसेच स्वामी विवेकानंद नागरी पतसंस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त प्रसाद, चहा पान, सुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक चंद्रकांत दसले यांनी दिली.
----
फोटो:- स्व. पंचप्पा कल्याणशेट्टी