प्रजासत्ताक दिनानिमित्त अरणमध्ये रक्तदान शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST2021-02-05T06:44:19+5:302021-02-05T06:44:19+5:30
मोडनिंब : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अविष्यत ट्रस्ट आणि अरण ग्रामस्थांच्या वतीने आयोजित शिबीरामधे १०१ दात्यांनी ...

प्रजासत्ताक दिनानिमित्त अरणमध्ये रक्तदान शिबीर
मोडनिंब : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अविष्यत ट्रस्ट आणि अरण ग्रामस्थांच्या वतीने आयोजित शिबीरामधे १०१ दात्यांनी रक्तदान केले. डॉ मिलिंद बागूल, गजानन बनसोडे, भागवत पाटील, महेश घाडगे, अक्षय वसेकर, सागर घाडगे व त्यांचा मित्र परिवार यांनी शिबीर आयोजनाची जबाबदारी पार पाडली. या शिबिरात ६० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
डॉ. सतिश माने, डॉ अशिष शेंडगे, डॉ. धनंजय कुलकर्णी, सुप्रिया शेळके, डॉ. अजिंक्य गिड्डे, डॉ. किसन गायकवाड यांनी गावातील जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करुन मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, माजी सभापती शिवाजी कांबळे, अँड विजय शिंदे, पांडुरंग राऊत, प्राचार्य हरिदास रणदिवे, सावता रणदिवे, यशवंत शिंदे, नाळे यांनी शिबिरास भेट दिली.
---
फोटो : २७ अरण
अरण येथील रक्तदान शिबीराप्रसंगी भारत शिंदे, शिवाजी कांबळे, अड विजय शिंदे, पांडुरंग राऊत