माळशिरस तालुक्यात २८९ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:34 IST2020-12-14T04:34:50+5:302020-12-14T04:34:50+5:30

माळशिरस : खा. शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुक्यातील अनेक गावांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. यामध्ये ...

Blood donation of 289 people in Malshiras taluka | माळशिरस तालुक्यात २८९ जणांचे रक्तदान

माळशिरस तालुक्यात २८९ जणांचे रक्तदान

माळशिरस : खा. शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुक्यातील अनेक गावांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. यामध्ये नातेपुते १०१, गिरवी ५१, पिलीव ८१, गोरडवाडी ५६ असे एकूण २८९ खा. शरद पवार प्रेमी तरुणांनी रक्तदान करून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अनेक रक्तदान शिबिरांना राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने यांनी भेटी दिल्या. यावेळी अजय सकट, अतुल पाटील, शरद मोरे, संदीप ठोंबरे, विनायक उराडे, बंटी सोरटे, आरिफ पठाण, भजनदास चोरमले, अमोल मदने, कुमार भैस, लहू पाटील, सुभाष सरगर, भानुदास शिंदे, अक्षय कचरे, अण्णा सरगर, दत्ता सरगर, रामा तांबवे, पिंटू सरगर, भिकाजी गोरड, खंडू कळमच्छी, रामचंद्र गोरड, भागवत कर्णवर, विष्णू गोरड, पांडुरंग पिसे यांनी रक्तदान शिबिरांना भेटी दिल्या.

फोटो ::::::::::::::::::::

रक्तदान शिबिरास भेट देताना युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, विजय सकट आदी.

Web Title: Blood donation of 289 people in Malshiras taluka