प्रशिकच्या शिबिरात २६४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:27 IST2021-08-25T04:27:58+5:302021-08-25T04:27:58+5:30

सोलापूर : प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने राजाभाऊ सरवदे यांच्या ६४ वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या शिबिरात २६४ दात्यांनी रक्तदान केले. ...

Blood donation of 264 people in the training camp | प्रशिकच्या शिबिरात २६४ जणांचे रक्तदान

प्रशिकच्या शिबिरात २६४ जणांचे रक्तदान

सोलापूर : प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने राजाभाऊ सरवदे यांच्या ६४ वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या शिबिरात २६४ दात्यांनी रक्तदान केले. सलग सहाव्या वर्षी मध्यवर्ती मिलिंदनगर बुद्धविहार येथे हे रक्तदान शिबिर पार पडले.

भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पहार अर्पण करून, बुद्धवंदना घेत, बौद्ध धर्माचे भिक्षू (भंते) यांना चिवर अर्पण करून, कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी महार वतनदार ट्रस्टचे अध्यक्ष देविदास बाबरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष अतुल नागटिळक, प्रशिक सामाजिक संस्थेचे प्रमुख सल्लागार सुशील सरवदे, दावला सुर्वे, शिवराज पुल्लुर, महेश पवार, सुमित शिवशरण, पवन थोरात, श्याम धुरी, सूरज निकंबे, विजय सोनवणे, नागेश रणखांबे, विकास सरवदे, उपगुप्त चौधरी, महादेव बाबरे उपस्थित होते. संस्थेचे प्रमुख शिवम सोनकांबळे, मयूर सरवदे, अजय बाबरे, सोनू इंगळे, अक्षय मस्के, माया बनसोडे, अप्पू लोंखडे, नेहाल बाबरे, अभी रणदिवज, साक्षांत बनसोडे, स्वप्निल कसबे, तेजस तळभंडारे, आदर्श दुपारगुडे, करण बाबरे, राकेश दुपारगुडे, विराज सरवदे, श्रेयश जाधव, प्रतीक इंगळे, आशिष सरवदे, आकाश दुपारगुडे, निशांंत बनसोडे, आदित्य बाबरे, आप्पा तळभंडारे यांनी परिश्रम घेतले.

-------------

फाेटो : २४ राजा सरवदे

प्रशिकच्या शिबिरात रक्तदान शिबिराप्रसंगी देविदास बाबरे, अतुल नागटीळक, सुशील सरवदे, दावला सुर्वे, शिवराज पुल्लुर, महेश पवार, सुमित शिवशरण, पवन थोरात, श्याम धुरी, सूरज निकंबे, विजय सोनवणे, नागेश रणखांबे.

Web Title: Blood donation of 264 people in the training camp