छत्रपती ग्रुपच्या शिबिरात १६१ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST2021-02-13T04:21:35+5:302021-02-13T04:21:35+5:30

बार्शी : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बार्शी शहरातील छत्रपती ग्रुपच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. भगवंत ब्लड बँकेत ...

Blood donation of 161 people in Chhatrapati group camp | छत्रपती ग्रुपच्या शिबिरात १६१ जणांचे रक्तदान

छत्रपती ग्रुपच्या शिबिरात १६१ जणांचे रक्तदान

बार्शी : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बार्शी शहरातील छत्रपती ग्रुपच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. भगवंत ब्लड बँकेत पार पडलेल्या या शिबिरात १६१ जणांनी रक्तदान केले.

दरवर्षी छत्रपती ग्रुपच्या वतीने विधायक उपक्रम राबविले जातात. यापूर्वी या ग्रुपच्या वतीने गरजू महिलांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन, शिक्षण घेणा-या गरजू मुलींना सायकल वाटप केले होते.

रक्तदान शिबीराचे उद्घाटन सचिन वायकुळे आणि भगवंत ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी बापूसाहेब पाटील, पिंटू राऊत, बापू पवार, भगवंत ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे, काझी, यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबीरासाठी राम पाटील, सारंग चौगुले, रोहित वाघमारे, राज देवकुळे, अजिंक्य डाके, सूरज व्हळे, आकाश जाधव, सिद्धेश्वर आलाट, समाधान राऊत, विनोद काकडे, गणेश कदम, गणेश कोल्हे, संदीप शाहीर, दीपक अतकरे यांनी परिश्रम घेतले.

----

फोटो : १२ बार्शी ब्लड कँप

छत्रपती ग्रूपच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घघाटन करताना सचिन वायकुळे, गणेश जगदाळे, राम पाटील

Web Title: Blood donation of 161 people in Chhatrapati group camp