वंचित बहुजन आघाडीच्यावतीने १०४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:19 IST2020-12-08T04:19:34+5:302020-12-08T04:19:34+5:30

रविवारी सकाळी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात ...

Blood donation of 104 people on behalf of deprived Bahujan Aghadi | वंचित बहुजन आघाडीच्यावतीने १०४ जणांचे रक्तदान

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने १०४ जणांचे रक्तदान

रविवारी सकाळी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे संजय कोकाटे, सरपंच प्रमोद कुटे यांच्यासह वंचित बहुजन संघटनेचे पदाधिकारी, तसेच विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मेडिकोअर ब्लड बँकेने रक्त संकलन केले. या कामी बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव विशाल नवगिरे, वंचितचे जिल्हा महासचिव विशाल नवगिरे, राहूल चव्हाण, प्रा. युवराज वजाळे, तालुकाध्यक्ष प्रवीण वाघमारे, टेंभुर्णी शहराध्यक्ष विशाल मिसाळ, ॲड. जुगल खरात, तुषार खरात, राजू वाघमारे, विक्रम खरात, किरण कांबळे, अविनाश लोंढे ,रामभाऊ नवगीरे, रणजित गायकवाड, गणेश खरात, तात्या सरोदे , प्रवीण बनसोडे, सुमित खरात, प्रवीण लांडगे, शुभम शिरसाट, सुमीत गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

-----०७टेंभुर्णी-ब्लड

रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, विशाल नवगिरे, राहुल चव्हाण, युवराज वजाळे, प्रवीण वाघमारे आदी.

Web Title: Blood donation of 104 people on behalf of deprived Bahujan Aghadi