टेंभुर्णीत शिवजयंतीनिमित्त १०१ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:35 IST2021-02-23T04:35:00+5:302021-02-23T04:35:00+5:30
सामाजिक बांधिलकी जोपासत मध्यवर्ती शिव जन्मोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात ...

टेंभुर्णीत शिवजयंतीनिमित्त १०१ जणांचे रक्तदान
सामाजिक बांधिलकी जोपासत मध्यवर्ती शिव जन्मोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.
शिबिराचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बंकट देशमुख,उद्योगपती नागेश बोबडे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा संयोजक भाऊ महाडिक,हरिभाऊ सटाले,सतीश चांदगुडे, अटकेपार झेंडा ग्रूपचे दयानंद महाडिक, योगेश भोसले, नागनाथ चांदगुडे, सोमनाथ महाडिक, सुदर्शन पाटील, सौरभ चव्हाण, दत्ता जाधव, मृणाल देशमुख, दीपक देशमुख, नवनाथ कदम, पांडुरंग महाडिक, बाबासो महाडिक, अशोक पाटील यांच्यासह रक्तदाते उपस्थित होते.
रक्त संकलन करण्यासाठी सोलापूर येथील मेडिकेअर ब्लड बँकेचे संचालक आदम शेख,डॉ. किरण कदम यांच्या टीम मधील ऐश्वर्या सुरवसे, आयशा शेख व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
-----२२टेंभुर्णी-ब्लड