निवडणूक आयुक्तांनी तपासली नाकाबंदी
By Admin | Updated: February 6, 2017 20:37 IST2017-02-06T20:37:07+5:302017-02-06T20:37:07+5:30
निवडणूक आयुक्तांनी तपासली नाकाबंदी

निवडणूक आयुक्तांनी तपासली नाकाबंदी
निवडणूक आयुक्तांनी तपासली नाकाबंदी
प्रात्यक्षिक पाहिले: पोलिसांना दिल्या सूचना
सोलापूर : राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी रविवारी सोलापूर दौऱ्यावर आल्यावर रात्री मुक्कामी असताना अचानकपणे मोटारीतून फिरून नाकाबंदीचे कामकाज कसे चालले आहे, याची पाहणी करून पोलिसांना धक्का दिला.
महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. हेलिकॉप्टरने त्यांचे विमानतळावर आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी रणजित कुमार, महापालिका आयुक्त विजयकुमार काळम—पाटील, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी त्यांचे स्वागत केले. महापालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये त्यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक कामाचा आढावा घेतला. त्यानंतर शासकीय विश्रामधाम येथे ते विश्रांतीसाठी गेले.
रात्री साडेअकरा वाजता सात नंबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांची गाडी अचानक बाहेर पडली. होटगीनाका येथे सुरू असलेल्या नाकाबंदीची त्यांनी पाहणी केली. पोलीस कशापद्धतीने वाहनांची तपासणी करतात हे त्यांनी थांबून पाहिले. त्यानंतर जुळे सोलापूरमार्गे विजापूरनाका येथे जाऊन त्यांनी नाकाबंदीची तपासणी केली. या ठिकाणी महामार्ग असल्याने वाहनांची संख्या मोठी दिसून आली. त्यांनी स्वत: थांबून वाहने तपासणीचे प्रात्याक्षिक घेतले. अचानक राज्याचे निवडणूक आयुक्त नाकाबंदीच्या तपासणीला आलेले पाहून पोलिसांची धावपळ उडाली. याची माहिती मिळताच इतर अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी सहारिया यांनी निवडणूक काळात २४ तासात सतर्क रहा अशा सूचना दिल्या.