शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भर पावसात मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ सोलापूर-बार्शी महामार्गावर रास्ता रोको

By appasaheb.patil | Updated: June 11, 2024 17:03 IST

लवकरात लवकर मराठा समाजासाठी सगेसोयरे कायदा लागू करण्यात यावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: मराठा समाजाला आरक्षण द्यावे, सगेसोयरे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर-बार्शी महामार्गावर वैराग (ता. बार्शी) येथील छत्रपती शिवाजी चौकात भर पावसात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. आंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दररोज वेगवेगळ्या गावात आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला.

या आंदोलनावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीची गांभीर्याने सरकाराने दखल घेऊन लवकरात लवकर मराठा समाजासाठी सगेसोयरे कायदा लागू करण्यात यावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक तानाजी पवार, मंडळ अधिकारी विरेश कडगंजी यांनी आंदोलन कर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी तलाठी महेश जाधव, गोपनीय शाखेचे किसन कोलते यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील