माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या अंगावर सोलापुरात फेकली काळी शाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 03:27 PM2021-11-21T15:27:30+5:302021-11-21T15:44:19+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Black ink thrown at former minister Babanrao Gholap in Solapur | माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या अंगावर सोलापुरात फेकली काळी शाई

माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या अंगावर सोलापुरात फेकली काळी शाई

Next

सोलापूर : चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर एका तरुणाने रविवारी सोलापुरातील समाज मेळाव्यात शाई फेकली.

मार्डी येथील यमाई देवी आश्रम शाळेमधील संचालक अशोक लांबतुरे आणि सुरेखा लांबतुरे यांनी केलेला भ्रष्टाचार चर्मकार समाजातील प्रमुख तथा आश्रम शाळेमधील संचालक मयत भानुदास शिंदे यांनी बाहेर काढला होता. त्याचा राग मनात धरून अशोक लाबतुरे आणि त्यांच्या पत्नी हे त्यांना वारंवार मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून भानुदास शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी शासकीय विश्रामगृहात आत्महत्या केली होती. या घटनेनंतर चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिंदे कुटुंबीयांना विश्वासात घेत न्याय देतो अशी ग्वाही देऊन अशोक लाबतुरे आणि त्यांच्या पत्नी यांना संघटनेतून काढून टाकले होते. जोपर्यंत शिंदे कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांना संघटनेत घेणार नाही असा शब्द दिला होता. तो शब्द खोटा ठरवत भानुदास शिंदे यांच्या कुटुंबाला फसवून त्यांना संघटनेत पुन्हा घेऊन सोलापुरात कार्यक्रम करण्यासाठी आलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांना मयत भानुदास शिंदे यांच्या कुटुंबीयांनी निषेध केला तर त्यांचे चिरंजीव धनु शिंदे यांनी स्टेजवर त्यांच्या तोंडाला काळे फासले, त्यांच्या नावे जाहीर निषेधाच्या घोषणा दिल्या.

यावेळी स्टेजवर आमदार प्रणिती शिंदे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका संगीता जाधव आणि समाजातील प्रतिष्ठित व्यासपीठावर उपस्थित होते. शिंदे कुटुंबीय आपल्या वडिलांच्या मारेकर्‍यांना तुम्ही पाठीशी का घालत आहेत असे म्हणत आपला रोष सभागृहांमध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सर्व समाजासमोर व्यक्त केला.

माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मयत भानुदास शिंदे यांच्या मारेकर्‍यांना पाठीशी घालत सोलापुरात आज कार्यक्रम घेतला, तर शिंदे कुटुंबीयांनी त्यांच्या तोंडाला काळे फासून जाहीर निषेध केला याही पुढे जर त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर माजी मंत्री घोलप यांचे कपडे फाडू असा इशारा देखील शिंदे यांचे चिरंजीव धनु शिंदे व इतर पिडीत कुटुंबीयांनी दिला.

Web Title: Black ink thrown at former minister Babanrao Gholap in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.