सोलापूरातील राष्ट्रवादीच्या एल्गार मोर्चाने भाजपाची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 15:15 IST2017-10-07T15:14:44+5:302017-10-07T15:15:25+5:30

भाजप सरकारची पोलखोल करणारी फलकबाजी  व  निषेध करत तसेच भाजप सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत सोलापूर शहर - जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट एल्गार मोर्चा काढून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढविला़

BJP's Polkhol in Solapur's Elgar Morcha | सोलापूरातील राष्ट्रवादीच्या एल्गार मोर्चाने भाजपाची पोलखोल

सोलापूरातील राष्ट्रवादीच्या एल्गार मोर्चाने भाजपाची पोलखोल


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ७ : शेतक-यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, इंधन दरवाढ, भारनियमन, शेतकरी आत्महत्या, गॅस दरवाढ, हेच का मोदी सरकारचे अच्छे  दिन,  सोलापुरातील मिनी आणि मेजर गाळेधारकांना रेडीरेकनर दराप्रमाणे भाडे आकारणी करावी,  सध्याचे गाळे त्यांना कायमस्वरूपी विकत देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, स्मार्ट सिटीच्या नावाखाली सोलापूरकरांनी सुरु असलेली फसवणूक, आरोग्य सेवेचा उडालेला   बोजवारा  आदी भाजप सरकारची पोलखोल करणारी फलकबाजी  व  निषेध करत तसेच भाजप सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत सोलापूर शहर - जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट एल्गार मोर्चा काढून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढविला़
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली या लक्षवेधी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते़सकाळी अकरा वाजता चार हुतात्मा पुतळा येथून मोचार्ला प्रारंभ झाला़ हा मोर्चा चार हुतात्मा पुतळा, आंबेडकर चौक, सिद्धेश्वर प्रशाला, मार्केट चौकीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर  झाले़  प्रभारी निवासी जिल्हाधिकारी रेश्मा माळी यांना मोर्चातील एका शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सादर केले़
यावेळी  माजी महापौर जनार्दन कारमपुरी,सुभाष पाटणकर, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर,माजी गटनेते पद्माकर काळे , प्रदेश महिला उपाध्यक्ष विद्या लोलगे , सेवादलाचे  अध्यक्ष चंद्रकांत पवार , महिला जिल्हा निरीक्षक निर्मला बाविकर, नगरसेविका सुनिता रोटे ,लता ढेरे,बिस्मिल्ला शिकलगर, सुवर्णा जाधव ,मंगला कोल्हे,रेखा सपाटे, मनीषा नलावडे , सुनंदा साळूंखे ,  प्रा.श्रीनिवास कोंडी,आनंद मुस्तारे ,  मनोज गादेकर,दीपक राजगे,शंतनू साळुंखे, ध्यानेश्वर सपाटे,पिरअहमद शेख,युवराज राठोड,राम साठे,गणेश पाटील,विजय भोईटे,सिकंदर गोलंदाज,अमीर शेख,हरिदास गायकवाड, प्रशांत बाबर , चिंतामनी सपाटे,डॉ.बसवराज बगले, जनार्दन बोराडे, जावेद खैरदि , प्रमोद भोसले , दिनेश शिंदे , सिकंदर गोलंदाज , व्यापारी असोसिएशनचे अशोक मुळीक , राजू आहुजा,राजू राजानी, विशाल देढीया,राजू पत्की,अनिल पानसे , युवराज माने ,  विलास लोकरे ,शाम गांगर्डे,राम पवार,किरण वाघमोडे,मनीषा माने, आदी  राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . 

Web Title: BJP's Polkhol in Solapur's Elgar Morcha