शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
2
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
3
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
4
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
5
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
6
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
7
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
8
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
9
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
10
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
11
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
12
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
13
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
14
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
15
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
16
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
17
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
18
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
19
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
20
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

भाजपच्या योजना म्हणजे आमची ब्ल्यू प्रिंटच, बाळा नांदगांवकर यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 4:17 PM

आजही महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा असल्याचे मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर म्हणाले़.

ठळक मुद्देसोलापूरमधील पक्षस्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदगावकर सोलापूर दौºयावरभाजपाने सर्व योजना मनसेच्याच ब्लू प्रिंटमधून उचलल्याचा आरोप

सोलापूर : सत्तेवर असलेल्या बीजेपी सरकारने ज्या काही योजना हाती घेतल्या आहेत त्या साºया मनसेने निवडणूक काळात जाहीर केलेल्या ब्लू प्रिंटमधील आहेत़ आजही महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा असल्याचे मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर म्हणाले़

कोल्हापूर आणि सोलापूरमधील पक्षस्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदगावकर हे सोलापूर दौºयावर आले होते़ सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपाने सर्व योजना मनसेच्याच ब्लू प्रिंटमधून उचलल्याचा आरोप केला़ पक्षस्थितीबाबत बोलताना आजही पक्षात अनेक नाराज आहेत, काही पक्षाच्या दरवाजात आहेत, कोणी बाहेर थांबलंय, कोणी रुसलंय आणि ऐकत नाही, अशा अनेक गोष्टी घडत असल्याचे सांगत यापुढे पक्षकार्यालयाने जे रिझल्ट देतील त्यांनाच पदे दिली जातील म्हणाले़ 

तसेच यावेळी शरद पवार यांच्याशी झालेली भेट आणि त्यापूर्वीच्या गुजरात दौºयावर प्रश्न उपस्थित केला असता लोक पाहिजे तेव्हा सोयीस्कर अर्थ काढत असतात, असे म्हणाले़ रतन टाटा यांच्या आवाहनावरून ते गुजरातला गेले़ गुजरातमध्ये त्यांना चांगली प्रगती दिसून आली आणि मोदींचे त्यावेळी राज ठाकरे यांनी कौतुक  केल्याचे म्हणाले़

 १२ वर्षे राज ठाकरे स्वत:च्या हिमतीवर पक्ष चालवत असल्याचे सांगून प्रत्येक पक्षाला यश-अपयश ठरलेले आहेच असे ते म्हणाले़ मनसे जेथे आहे तेथे आक्रमक आंदोलने होतात़ परंतु शेतकºयांच्या प्रश्नांवर मुंबईत जेवढी आक्रमकता दाखवली तेवढी मुंबईबाहेर दाखवता आली नसल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली़ यावेळी मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, शहर अध्यक्ष युवराज चुंबळकर, प्रशांत इंगळे यांच्यासह पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते़.

बाबा जाधवराव संपर्कप्रमुख नाहीतच्बाबा जाधवराव हे मनसेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख नाहीत आणि जयवंत माने जिल्हाध्यक्ष नसल्याचा खुलासा यावेळी नांदगावकर यांनी केला़ शेतकरी पक्षासाठी काम करणाºया बाबा जाधवराव यांना केवळ महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती़ तसेच जयंवत माने यांना आपण सांगण्यावरूनच तिकीट दिले गेले होते़ परंतु भालके गटाला मदत केल्याने त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढल्याचे त्यांनी सांगितले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरMNSमनसेBala Nandgaonkarबाळा नांदगावकर