सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे १०२ पैकी ९० जागांवरील उमेदवार निश्चित झाले आहेत. माजी आमदार दिलीप माने गटाला किती जागा द्यायच्या यासह भाजपमध्ये आलेले माजी उपमहापौर नाना काळे, किसन जाधव आणि प्रथमेश कोठे यांच्या उमेदवारीवरुन त्रांगडे निर्माण झाले आहे. हे त्रांगडे कसे सुटणार याकडे सोमवारी लक्ष असेल.
पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सचिन कल्याणशेट्टी रविवारी सकाळपासून होटगी रोडवरील पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबून होते. सकाळच्या सत्रात मनीष देशमुख यांनी त्यांची भेट घेतली. दरम्यान, भाजपचे उमेदवार ठरविण्याचे अधिकार आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांना देण्यात आले आहेत आ. कोठे यांनी इतर दोन आमदारांच्या मतदारसंघात उमेदवारांची मागणी केली आहे. महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आ. कोठे यांच्या माध्यमातून बिज्जू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी, नाना काळे, प्रथमेश कोठे, विनायक कोंड्याल यांचे पक्ष प्रवेश मनीष देशमुख पुन्हा चर्चेत प्रभाग २४ मधून मनीष देशमुख उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे माजी नगरसेवक नरेंद्र काळे काय करणार याकडे लक्ष असेल. माजी आमदार दिलीप माने गटाने प्रथम पक्षाचे काम करावे.
त्यामुळे आता जागा सोडणार नाही, अशी भूमिका आ. देशमुख यांनी घेतली आहे.
आता दोघांचीही अडचण
आ. सुभाष देशमुख यांनी प्रभाग २२ मधून शीतल गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. आ. कोठे यांनी या प्रभागातून किसन जाधव, नागेश गायकवाड यांना प्रवेश दिला. मी एकमेव उमेदवार जाहीर केला. त्यामुळे शीतल गायकवाड यांनाच उमेदवारी दिली पाहिजे. जाधव आणि नागेश गायकवाड यांचा प्रवेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झाला. आता या दोघांची अडचण झाली आहे.झाले. या सर्वांना उमेदवारी देण्याचा शब्द प्रदेशाध्यक्षांनी दिला होता. या उमेदवारीचा वाद मुंबई दरबारी गेला आहे.
कुणी कसा दिला शब्द
आ. कोठे यांनी प्रभाग ७ मधून नाना काळे आणि प्रभाग ११ मधून युवराज सरवदे यांच्या उमेदवारीची मागणी केली. प्रभाग १० आणि ११ मधून प्रथमेश कोठे यांनी सहा जागांची मागणी केली. या तिघांनी विधानसभेला विरोध केला म्हणून आ. देशमुख उमेदवारी देण्यास विरोध करीत आहेत. परंतु, आमदार होण्यापूर्वी आपण प्रभाग ७ मधून निवडून आलो होतो. त्यामुळे प्रभाग ७ च्या एका जागेवर आपला हक्क असल्याचे सांगत आ. कोठे गेल्या चार दिवसांपासून नाना काळे यांच्या उमेदवारीवर ठाम आहेत. सरवदे आणि प्रथमेश कोठे यांना उमेदवारी देण्याचा शब्द प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिला आहे.
Web Summary : Solapur BJP faces candidate selection issues for corporation elections. Factions led by Mane, Kale, Jadhav, and Kothe create challenges. Internal disputes escalate over seat allocation, with state leaders intervening to resolve the deadlock.
Web Summary : सोलापुर भाजपा को निगम चुनावों के लिए उम्मीदवार चयन में समस्याएँ। माने, काले, जाधव और कोठे के नेतृत्व वाले गुटों ने चुनौतियाँ खड़ी कीं। सीट आवंटन को लेकर आंतरिक विवाद बढ़े, राज्य के नेताओं ने गतिरोध को दूर करने के लिए हस्तक्षेप किया।