शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'कपबशीचं बटण दाबलं तरी भाजपालाच मतदान', आंबेडकर पिता-पुत्रांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 12:46 IST

सोलापूर जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये सकाळपासूनच बिघाड झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पुणे - प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी गंभीर आरोप केला आहे. वंचित बहुजन आघाडीसमोरली बटण दाबले तरी मतदान कमळालाच जात आहे, असे आरोप सुजात आंबेडकर यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक दावा केला. मतदान यंत्रामध्ये घोळ करण्यात आला आहे.  कप बशीचे बटण दाबले जात नाही आणि दाबले गेलेच तर मत कमळाला जात आहे, असा दावा त्यांनी  केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये सकाळपासूनच बिघाड झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, अनेक ठिकाणी उशिरा मतदान सुरू झाल्याचेही वृत्त आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर बोट दाखवत गंभीर आरोप केला आहे. सुजात म्हणाले की, विविध भागातले लोक मला फोन करत आहेत. वंचितला मतदान केले, तरी मत भाजपला जात आहे, असे ते मला सांगत आहेत. ग्रामीण भागासह  शहरी भागात मिळून एकूण 35 ठिकाणी असे प्रकार घडल्याचे सुजात यांनी म्हटले. सुजात हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव आहेत. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यंदा वंचित बहुजन आघाडीने 39 मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. यापैकी अनेक मतदारसंघात सुजात यांनीही उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या आहेत. तर, कपबशी हे चिन्ह वंचित बहुजन आघाडीला देण्यात आलं आहे.  

सुजात पाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांनीही मतदान यंत्रात घोळ असल्याचं म्हटलं आहे. मात्र, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. तरीही, मतदान यंत्रात बिघाड, मतदान करण्यास वेळ वाढवून द्यावा, काँग्रेस ला मतदान केल्यास भाजपला मतदान होत असल्याबाबत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीहीी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019lok sabhaलोकसभाElectionनिवडणूक