शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

गाडीतून उतरले, उठ म्हणाले अन्... सोलापुरात पोलीस आयुक्तांनी मारली भाजप पदाधिकाऱ्याला लाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 16:05 IST

सोलापुरातील भाजप पदाधिकाऱ्याला पोलीस आयुक्तांनी लाथ मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ACP kicks BJP Part Worker : पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष जिशान मोहम्मद सलीम सय्यद यांना लाथ मारल्याचा प्रकार घडला आहे. पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांची भेट घेऊन केली आहे.

भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी शुक्रवारी याबाबतचे निवेदन दिले आहे. यात किडवाई चौक येथे गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास जिशान सय्यद थांबलेले असताना त्यांना अर्वाच्य भाषा वापरून शिवीगाळ करून लाथ मारली. वाहतुकीचे नियम मोडलेले असतील तर वाहतूक नियमाप्रमाणे पोलिसांनी कारवाई करावी. कायद्याच्या चौकटीच्या अधीन राहून कारवाई केल्यास हरकत नव्हती. पण, मुद्दामहून टार्गेट केल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मी पार्किंगच्या झोनमध्ये थांबलेलो होतो. तेव्हा एसीसी खिरडकर यांनी मला शिवीगाळ करत लाथ मारली. याबाबत पोलिस आयुक्तांना निवेदन दिले. त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे, अशी माहिती तक्रारदार जिशान सय्यद यांनी दिली. तर त्या घटनेबाबतचे निवेदन शुक्रवारी मला दिले. त्यावर चर्चा झाली. त्यावेळी झालेले गैरसमज दूर झाले आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली.

भाजपा कार्यकर्ता जिशान सय्यद यांना लाथ मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एसीपी सुधीर खिरडकर हे रस्त्यातून जात असताना जिशान हे चौकातच दुचाकीवर बसलेले होते. त्यावेळी एसीपी त्यांना काहीतरी बोलत असतात. पण तरी जिशान तसेच बाईकवर बसून होते. त्यांची गाडीवरील बसलेली पोझिशन पाहून रागाने येऊन त्यांना लाथ मारल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ एकूण २८ सेकंदांचा आहे. किडवाई चौकात वाहतूक पोलिस हे वाहतुकीचे नियंत्रण करत होते. त्यावेळी त्यांच्या समोरून एसीपी खिरडकर यांची गाडी येते. त्यानंतर ते गाडी रस्त्यातच थांबवून जिशान यांच्याकडे गेले. त्यानंतर हा प्रकार घडला. यावेळी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, ही घटना जेथे घडली तेथून जवळपास शंभर मीटर अंतरावरील कॅमेऱ्यात हा व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे. भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महिला आघाडी शहराध्यक्ष विजया वड्डेपल्ली, अल्पसंख्याक शहराध्यक्ष जाकीर सगरी व भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महामंत्री जिशान सय्यद यांनी एसीपी सुधीर खिरडकर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांना दिलं आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाPoliceपोलिस